special story on international nurses day 2020 
कोल्हापूर

कोरोना कक्षातील धडपड मन हेलावणारी; काळजाचंही होतय पाणी पाणी ...

संदीप खांडेकर

कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर शेजाऱ्यांत धडकी भरते, तिथला परिसर प्रतिबंधित केला जातो. काही दिवस त्या परिसरात सन्नाटा पसरतो. कोरोनाबाधित कुटुंबाकडे कोणी फिरकेल की नाही, हे सांगता येत नाही.

कोरोना रुग्णाची विचारपूस करण्याचा विचार दूरच. याउलट परिचारिकांकडून कोरोना रुग्णांच्या सेवेचे काम नेटाने सुरू आहे. कोरोनाचा रुग्ण आल्यावर त्यांची घालमेल जरूर होते. त्यांच्या काळजाचंही पाणी होतं. मात्र, रुग्ण आपल्याच कुटुंबातील एक घटक समजून त्याच्या सेवेत त्यांचा दिवस मावळतो. ब्रदर व वॉर्डबॉय यांचीही कोरोना कक्षातील धडपड मन हेलावणारी ठरते. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), आयजीएम (इचलकरंजी) येथे हे चित्र रोज अनुभवायला मिळत आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भक्तीपूजानगरमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर शहरवासीयांत थरकाप उडाला. रुग्णाच्या उपचारांत मात्र परिचारिकांनी कसूर केली नाही. आजपर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांची परिचारिकांनी सेवा केली. संशयित, पॉझिटिव्ह व रिकव्हरी स्टेजला आलेल्या रुग्णांच्या सेवेत त्यांनी हयगय केली नाही. परिचारिकेचे काम रुग्णांची सेवा करण्याचे असल्याने रुग्ण कोणत्या 
आजाराने ग्रस्त याचा विचार त्यांच्या मनालाही शिवला नाही. कोरोनाचा रुग्ण आल्यानंतर त्याची सेवा हेच त्यांचे व्रत राहिले. सीपीआरमध्ये तीनशे परिचारिका असून त्यांनी रुग्णांच्या सेवेत तडजोड केली नाही. तीन शिफ्टमध्ये 
त्यांचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे कौटुंबिक 
जबाबदारी पेलत त्यांचे काम सुरू आहे. एखादा रुग्ण आला, की त्याही अस्वस्थ होतात. मात्र, रुग्णाला बरे करायचे, असा निर्धारही करतात. 

१४ दिवस ऑनड्युटीचे पेमेंट द्यावे
सुरक्षिततेसाठी किट अंगावर चढवून त्यांच्या सेवेत रूजू होतात. रणरणत्या उन्हात किट चढवून काम करणे कठीण असले तरी ते काम त्या नेटाने करतात. वॉर्ड बॉय व ब्रदरही रूग्णांच्या सेवेत तडजोड करत नाहीत. रूग्णाला वेळेवर औषध देणे, त्याला जेवण मिळाले का? ते पाहणे, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे का., याची हे नोंद घेतात. शासकीय व खासगी रूग्णालयांतील परिचारिकांचा एकूण आकडा पाच हजारांवर आहे. खासगी रूग्णालयात दाखल झालेला रूग्ण कोरोबाधित निष्पन्न झाला तर परिचारिकांची तपासणी, चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन करावे लागते. मात्र, ते चौदा दिवस ऑनड्युटी गृहित धरून त्यांचे पेमेंट द्यावे, अशी मागणी आहे. 

जिल्ह्यातील परिचारिका कोरोना आजाराविरुद्ध लढा देत आहेत. त्या रुग्णांची देखभाल करण्यात कमी पडत नाहीत. परिचारिकांची ड्यूटी चार तास करावी, ही मागणी आहे. तसेच त्यांच्या निवास व जेवणासाठी एकाच ठिकाणी सोय होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वसतिगृहाची मागणी केली आहे. 
- हाशमत हावेरी, अध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT