sports directory starts in kolhapur the activity of sport department 
कोल्हापूर

@कोल्हापूर स्पोर्टस्‌ डिरेक्‍टरी! जिल्हा क्रीडा कार्यालयाचे पुढचे पाऊल

संदीप खांडेकर

कोल्हापूर : क्रीडानगरी म्हणून जिल्ह्याचा गाजावाजा होत असला तरी विविध खेळांची एकत्रित माहिती उपलब्ध होणे तसे कठीणच. एखादा तालुक्‍यात कोणता खेळ सर्वाधिक खेळला जातो, तेथे मैदाने किती आहेत, दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था-संघटना कोणत्या, याची माहिती परप्रांतीय खेळाडूला हवी असल्यास ती मिळत नाही. यावर रामबाण इलाज म्हणून जिल्हा क्रीडा कार्यालयाने ‘कोल्हापूर स्पोर्टस डिरेक्‍टरी’ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातून जिल्ह्यातील क्रीडाविषयक घडामोडींचा नेमकेपणाने वेध घेतला जाणार आहे. 

शालेय क्रीडा स्पर्धेत एकूण ४९ खेळ प्रकारांचे आयोजन केले जाते. या क्रीडा प्रकारांच्या जिल्हा संघटना अस्तित्वात असून, त्यांचे प्रतिनिधी स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होतात. काही क्रीडा प्रकारांच्या दोन अथवा तीन संघटना आहेत. जे क्रीडा प्रकार शालेय स्तरावर आयोजित केले जात नाहीत, त्यांच्याही संघटना स्थापन झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव वेगवेगळ्या खेळांसाठी ओळखले जाते. 

नूलची हॉकी, इचलकरंजीचा खो खो, शिरोली पुलाची, राधानगरी, सडोली खालसाची कबड्डी, कोल्हापूर शहरचा फुटबॉल, क्रिकेट, जलतरण, नेमबाजी, मालेचा बॉक्‍सिंग, कोपार्डे, मुरगुड, बानगे, आमशी, वाकरे, पाडळी, दिंडनेर्लीची कुस्ती, मिनी चेची धनुर्विद्या व नेटबॉल ही ओळख तयार झाली आहे. या क्रीडा संघटनांची कार्यालये एका छताखाली नाहीत. किंबहुना त्यांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे होत असल्याने क्रीडा 
कार्यालयाकडे त्यांची माहिती एकत्रित नाही. परजिल्ह्यातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांची माहिती हवी असल्यास अडचण येते. हे लक्षात घेत क्रीडा कार्यालयाने कोल्हापूर स्पोर्टस डिरेक्‍टरी करण्याचे काम हाती घेतले आहे. 

"कोल्हापूर स्पोर्टस्‌ डिरेक्‍टरीची पुस्तिका तयार होणार आहे. ही माहिती क्रीडा कार्यालयाच्या वेबसाईटवर ठेवण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा प्रकारांची माहिती सर्वांना सहज उपलब्ध होईल."

- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी

दृष्टिक्षेपात

  • शालेय स्तरावर एकूण क्रीडा प्रकार : ४९
  •  शालेय राष्ट्रीय स्तरावर २०१९-२० ला शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले खेळाडू : २३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

१६ वर्षांपूर्वी हुप्पा हुय्या म्हणत घडवला इतिहास आता 'बजरंगी' येणार भेटीला; पोस्टरमधील अभिनेत्याला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT