student  Esakal
कोल्हापूर

कोल्हापुरात एसटी सुरु करण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर

गेली काही दिवस एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन (ST Workers Strike) सुरु आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरीकांन बरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यातच कोरोना कालावधीनंतर आता शाळा, काॅलेज सुरु झाले असतानाच विद्यार्थ्यांना पायपीठ करावी लागत आहे. तसेच खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, एसटीची वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी पन्हाळा (Panhala) तालुक्यातील कळे (Kale) इथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एसटी सेवा बंद असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून एसटी सेवा सुरु करावी अशी मागणी या विद्यार्थ्यातून होत आहे.

गेल्या सव्वा महिन्यापासून लांबत चाललेल्या एसटी संपामुळे सर्वसामान्य प्रवासी हतबल झाला आहे. एसटी प्रशासनने कामागारांनी कामावर हजर रहावे असे आवाहन केले आहे. तरीही एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी वर्गाने संप लावून धरला आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून हजारो विद्यार्थी आता एसटी प्रवास लवकर सुरु व्हावा ही मागणी घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

राज्यात पहिल्यांदाच कोल्हापुरात कळे या गावात इतक्या मोठ्या संखेने विद्यार्थी रस्त्यावर उतरुन एसटी सुरु करण्याची मागणी ठामपणे करत आहेत. त्यामुळे आतातरी एसटी कर्मचाऱ्यांनी सबुरीने घ्यावे. व सर्वसामान्यांच्या अर्थकारणाला, मानवी जगण्याला बळ देणाऱ्या एसटीचा प्रवास पुन्हा एकदा सुखकर व सुरक्षित सुरु व्हावा अशीच अपेक्षा केली आहे.

एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन सुरु केले. राज्यभरातील प्रवासी वाहतुक ठप्प झाली. या संपामध्ये राज्यभरातील ९२ हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. संप सुरु झाल्यानंतर परीवहन मंत्री अनिल परब यांनी शिष्ठमंडळांशी चर्चा केली. वेतनवाढ, शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची तयारी दर्शवली. किंबहुना त्याची अंमलबजावणीही केली. आता तरी कामावर हजर रहावे असे आवाहन केले. मात्र कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले. त्यामुळे आज विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एसटी प्रवास सुरु व्हावे या मागणीसाठी केलेले प्रयत्न राज्यभरात अधोरेकित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

भारतीय संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही, Dream11ने मोडला BCCIसोबतचा करार; आशिया कपसाठी जर्सीवर कोणाचं नाव?

Nanded Mumbai Vande Bharat Express: नांदेड मुंबई ‘वंदे भारत’ मंगळवारपासून धावणार

ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली

SCROLL FOR NEXT