Starvation on artist-technicians due to lockdown; 115 art associations in the state gathered! 
कोल्हापूर

लॉकडाउनमुळे कलाकार-तंत्रज्ञांवर उपासमार ; राज्यातील 115 कला संघटना एकवटल्या! 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर :  गेले साडेपाच महिने घरात बसून आहे... हाताला काही कामच नाही... शिलकीत जेवढं काही होतं- नव्हतं ते सारं काही संपलं... शासनाच्या योजनेतून रेशन मिळाले... पण, आता पुढे काय करायचे, हा प्रश्‍न आहेच... एकूणच सारी आर्थिक घडी विस्कळित झाली आणि त्यामुळे मानसिक स्थिती बिघडत चालली आहे... लोककला केंद्रातील कलाकार सुमन अंधारे अक्षरशः हतबल होऊन सांगत असतात. अंधारे या एक प्रातिनिधिक उदाहरण. पण, राज्यभरातील हजारो कलाकार- तंत्रज्ञांवर लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली आहे आणि या पार्श्‍वभूमीवर शासनाकडे विविध मागण्यांसाठी 115 कला संस्था एकवटल्या आहेत. 
राज्यातील लोककला केंद्रापासून अगदी बड्या स्टारपर्यंत प्रत्येक घटकाला लॉकडाउनचा मोठा आर्थिक फटका बसला. त्यातही लोककला केंद्रे, तमाशा, वाघ्या मुरळी, दशावतार मंडळे असोत किंवा कलापथके, बॅंडपथके, ऑर्केस्ट्रा अशा हंगामी कार्यक्रमांवर आर्थिक मदार असलेल्या घटकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. यात्रा-जत्रांवरच प्रशासनाने बंदी घातल्याने एकही मनोरंजनाचा कार्यक्रम ऐन हंगामात होऊ शकला नाही. 
राज्यातील एकट्या डोंबारी-कोल्हाटी समाजाचा विचार केला तरी राज्यात 60 हजारांहून अधिक लोकसंख्या असून, त्यातील 30 ते 40 टक्के जण लोककलावंत म्हणून काम करतात. कलापथकांचा विचार केला तर सर्वाधिक कलापथके कोल्हापुरात आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत मिळून तब्बल दोन हजार 200 यात्रा हंगामात होतात. मात्र, महापूर आणि कोरोनामुळे सलग दोन वर्षे एकही यात्रा झाली नाही. पर्यायाने मनोरंजनाचे कार्यक्रम झाले नाहीत. विवाह सोहळ्यांवरही बंदी असल्याने घडशी समाज असो किंवा बॅंडपथकांना त्याचा मोठा फटका बसला. बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या तंत्रज्ञांचीही राज्यात मोठी संख्या आहे. एकूणच, या साऱ्या क्षेत्राचा विचार केला तर गणेशोत्सवापासून सराव तालमींना प्रारंभ होतो आणि पुढे हंगामात सर्वत्र कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, यंदा गणेशोत्सवानंतरही मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंदी असल्याने एकूणच या क्षेत्रात संभ्रमावस्था आहे. 


राज्यभरातील कलाकार-तंत्रज्ञांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिखर संस्थेच्या माध्यमातून आजअखेर 115 कला संस्था एकवटल्या आहेत. शासनदरबारी कलाकारांच्या नोंदी, आरोग्य विमा, घरकुल आणि इतर सवलती मिळाव्यात, यासाठी कलाकार कल्याणकारी मंडळाची प्रमुख मागणी आहे. 
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, महाकला मंडल 

लॉकडाउननंतर सारे व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत. चित्रपट- मालिकांचे चित्रीकरणही सुरू झाले. मग, बाकीच्या कलाप्रकारांवर अन्याय का? कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळायला आम्ही तयार आहोत. पण, शासनाची आमच्याबाबत एवढी अनास्था कशासाठी..? 
- शिवाजी डवरी, रेणुका लोककला केंद्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT