कोल्हापूर

ऊसतोडणी मजूरांसाठी गुड न्यूज; जिल्‍हास्तरावर समिती स्थापन

जिल्हाधिकारी अध्यक्ष; मजूर, वाहतूकदारांची होणार नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारांसाठी राज्य शासनाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. त्यानुसार राज्यातील ऊसतोड मजुरांची नोंदणी करून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी जिल्‍हास्तरावर समिती स्थापन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल.

जिल्ह्यातील ६० हजारांवर ऊसतोडणी मजूर वाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे. २० वर्षांपासून राज्यातील तोडणी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ व्हावे, ऊसतोड मजुरांच्या जगण्याचा स्तर उंचावण्याबरोबर त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी सुविधा द्याव्यात, आरोग्य विम्यापासून ते घरबांधणीसाठी शासनस्तरावर मदत व्हावी आदी मागण्यांसाठी सीटू संघटनेंतर्गत शेकडो आंदोलने झाली. यातून शासनाबरोबर अनेकदा चर्चा झाल्या.

माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी ऊसतोडणी मजुरांसाठी शासनाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा केला होता. आता शासनाने मजुरांसाठी कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली. भविष्यात तोडणी कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येईल. असे लाभ देण्यात अडचणी आल्यास या समिती कायदेशीर मार्गाने तोडगा काढेल. समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. याशिवाय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला बालविकास अधिकारी, कामगार आयुक्त असे अधिकारीही सदस्य म्हणून आहेत. समितीची बैठक येत्या आठवड्यात होणार आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ. सुभाष जाधव यांनी दिली.

ष्टिक्षेपात...

मुख्यालय बीड व शाखा परभणीत आहे

अन्य जिल्ह्यांत जिल्हा समिती काम पाहील

१२ जिल्ह्यांत मजूर व वाहतूकदार आहेत

राज्यात तोड मजूर वाहतूकदार - १० लाख

कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या- ५० हजार

वाहतूकदार - १० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT