State Government Order Property cannot be sold for 15 years kolhapur marathi news 
कोल्हापूर

‘ती’ प्रॉपर्टी १५ वर्षे नाही विकता येणार ; राज्य शासनाचा आदेश, बंगला, फ्लॅट, रो बंगल्यासाठी अट लागू 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  आज (ता. १)पासून महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्क्‍याची सवलत मिळणार असली तरी संबंधित महिलेला खरेदी केलेली मिळकत पुढील पंधरा वर्षे कोणालाही विकता येणार नाही, असे आदेश राज्य शासनाने आज काढले. बंगला, फ्लॅट, रो बंगल्यासाठी ही अट लागू असेल. शेती खरेदी करताना मात्र मुद्रांक शुल्कात कोणतीही सवलत असणार नाही.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) एक टक्‍यांची सवलत जाहीर केली. त्याची अंमलबजावणी उद्यापासून होत आहे. महिलांच्या नावावर जास्तीत जास्त मिळकती व्हाव्यात,  यासाठी सवलत दिली गेली. खरेदी विक्रीचा व्यवहार म्हटले की प्रत्येकवेळी कुटुंबाप्रमूखाचे अर्थात पुरूषाच्या नावाने व्यवहार व्हायचा. महिलांच्या नावावर मिळकत व्हावी, यासाठी सवलत दिली गेली. केवळ सवलत घेऊन कोणीही मिळकतीचा व्यवहार करण्यास मोकळे होऊ नये, तसेच सवलतीचा गैरफायदा घेऊ नये, यासाठी एकदा मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर पुढे पंधरा वर्षे ती विकता येणार नाही. अटीचा भंग झाल्याचे आढळून आल्यास मुद्रांक शुल्कातील सवलत दंडासह वसूल केली जाणार आहे. या अटीमुळे किमान पंधरा वर्षे तरी संबंधित महिलेच्या नावे मिळकत राहण्यास मदत होईल. खरेदीदाराचा मृत्यू झाल्यास तिच्या वारसांना मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार नाही.

बंगला, फ्लॅट तसेच रो बंगला खरेदीसाठीच सवलत असेल. खुला भूखंड अथवा शेती खरेदीसाठी सवलत नसेल. शहरी भागात मुद्रांक शुल्क सहा टक्के इतके असेल त्यात एका टक्का तसेच गामीण भागात पाच टक्के मुद्रांक शुल्क असेल. त्यात महिलांना एक टक्का सवलत मिळेल. एक लाखाला किमान दहा हजारापर्यंत सवलत मिळेल. सवलतीमुळे शासनाच्या महसूलात थोडीफार घट होणार असली तरी महिलेला तिच्या हक्काचे घर मिळावे यासाठी ही सवलत महत्वाची मानली जाते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात महिलांच्या नावावर नेमक्‍या किती मिळकती होतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

अशी असेल सवलत
 नव्या नियमाचा लाभ घेणाऱ्या महिलेल्या नावे होणार मालमत्ता
 शहरी भागात सहा टक्के, ग्रामीण भागात पाच टक्के मुद्रांक शुल्क यात महिलांना एक टक्का सवलत
 दहा लाखांच्या बंगला, फ्लॅट खरेदीसाठी १० हजारांची, त्यापटीत वाढणार सवलतीची रक्कम 
 शेती, खुला भूखंड खरेदीस नाही सवलत


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT