Step Set Go App developed by Shivjeet Ghatge He is the cousin of Samarjeet Singh Raje Ghatge 
कोल्हापूर

आता चालण्यावरही मिळणार तुम्हाला मोठे बक्षिस

औंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : लोकांना चालण्याची सवय लागावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ‘स्टेप सेट गो’ हे ॲप बनवले आहे. आपण रोज किती पावले चालतो, याची नोंद हे ॲप ठेवते. एक हजार पावले चालल्यावर त्याचे गुण मिळतात. विशिष्ट गुण मिळाले, की त्या व्यक्तीला आकर्षक भेटवस्तू मिळते. आतापर्यंत जगभरातल्या ६४ लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. मूळचे कोल्हापूरचे असणारे शिवजित घाटगे यांनी हे ॲप बनवले आहे. सध्या ते मुंबईत स्थायिक आहेत. शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे यांचे ते चुलत भाऊ आहेत. 


 या ॲपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सुलभ पद्धतीने करू शकतो. आरोग्य, व्यायाम, डाएट यासह अन्य बाबींना केंद्रस्थानी ठेवून वेलनेस हे नवे सेक्‍टर समोर आले आहे. स्टेप सेट गो हे यातीलच एक ॲप आहे. शिवजित घाटगे, निफाल सुराखिया, अभय पाय यांनी मिळून १० जानेवारी २०१९ रोजी हे ॲप बनवले आहे. हे ॲप प्ले स्टोअर व ॲप स्टोअर येथे उपलब्ध आहे.

ॲप डाउनलोड केल्यावर त्यावर आपण रोज किती पावले चालतो याची नोंद ठेवली जाते. एक हजार पावले झाल्यावर सक्‍सेस गो कॉईन मिळतो. अशा प्रकारे काही ठराविक कॉईन खात्यात जमा झाले, की आकर्षक भेटवस्तू मिळते. यात दुचाकी, आयफोन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू मिळतात. आतापर्यंत तीन व्यक्तींना दुचाकी तर २० व्यक्तींना आयफोन भेट मिळाले आहेत. आजपर्यंत जगभरातील ६४ लाख लोकांनी हे ॲप डाउनलोड केले आहे. 

चालणे हा सर्वांत सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे; मात्र अनेक कारणांनी लोक चालण्याचा आळस करतात. लोकांना चालण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांनी चालावे, त्यांचे आरोग्य चांगले राहावे हा ॲप निर्मितीचा उद्देश आहे. 
- शिवजित घाटगे, स्टेप सेट गो ॲपचे निर्माते.

पंतप्रधानांकडून गौरव 
आत्मनिर्भर भारत, ॲप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये हेल्थ विभागात स्टेप सेट गो ॲपला प्रथम क्रमांक मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात या ॲपचा उल्लेख करून त्याच्या यशाबद्दल निर्मात्यांचे कौतुक केले आहे. 

  संपादन -  अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

Gokul Chairman Election Controversy : 'जय-पराजय होतात, पण माझ्या मुलाबद्दल जे केलं त्याबद्दल फार खंत वाटते, ते जिव्हारी लागलंय'; हसन मुश्रीफांनी व्यक्त केलं दु:ख

Daily Horoscope : राशिभविष्य - शनिवारी ७ नोव्हेंबर २०२६

Mohammed Shami retirement from Tests: "आज, जड अंतःकरणाने..."; मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला, चांगल्या-वाईट काळात माझ्यावर...

SCROLL FOR NEXT