stray dog will be identified by the yellow stripe
stray dog will be identified by the yellow stripe 
कोल्हापूर

आता पिवळ्या पट्टयावरून ओळखणार भटकी कुत्री 

युवराज पाटील

कोल्हापूर : शहरातील भटक्‍या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टे बांधले जाणार आहेत. संबंधित कुत्र्याचे निर्बीजीकरण तसेच लसीकरण कधी झाले याची माहिती या बेल्टमुळे मिळणार असल्याचे मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले. 

कुत्रे निर्बीजीकरण केंद्रातून पहिली बॅच बाहेर पडेल, त्या कुत्र्यांच्या गळ्यात बेल्ट बांधले जातील. कोल्हापुरात पहिल्यांदाच भटक्‍या कुत्र्यांसाठी अशा प्रकारचा प्रयोग होत आहे. शहरात सध्या गल्लीगल्ली, कॉलनीचा परिसर, सार्वजनिक उद्याने, तसेच रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात खाण्यासाठी काही न मिळाल्याने ही कुत्री अधिक आक्रमक झाली, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यानी खाण्याची व्यवस्था केली. 

झूम प्रकल्पावर कचऱ्याचे ढीग असल्याने त्या परिसरात कुत्र्यांची संख्या अधिक आहे. शहराचा आज कुठलाही भाग असा नाही, की तेथे भटकी कुत्री नजरेस पडत नाहीत. अशी कुत्री रात्री अंगावर धाऊन येणे तसेच चावण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात निर्बीजीकरणाचे केंद्र काही दिवस बंद होते. आयसोलेशन जवळ हे सेंटर आहे पॅनेलवरील डॉक्‍टर, डॉग कॅचर, मदतनीस असा कर्मचारी वर्ग आहे. वैशिष्टय असे की कुत्री पकडणारे तरूण हे नेपाळी आहेत. एखाद्या ठिकाणी कुत्र्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर त्यांना कसरत करावी लागते. विशिष्ट आकारातील कुत्रे बसेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येते. हल्ली काही पकडणारी गाडी आल्यानंतर पटकन त्यांना कर्मचाऱ्यांची ओळख होते. कुत्रे भुंकत राहते मात्र ते जोपर्यत जाळ्यात सापडत नाही तोपर्यंत कर्मचारीही स्वस्थ बसत नाहीत. 

चीप बसविण्याची प्रक्रिया लांबणीवर... 
भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरण कधी झाले आहे, याची माहिती मिळण्यासाठी पिवळ्या रंगाचे बेल्ट गळ्यात बांधले जाणार आहेत. ज्याच्या गळ्यात अशा पट्टा असेल त्याचे निर्बीजीकरण तसेच लसीकरण झाले आहे, असे समजले जाणार आहे. कुत्र्यांच्या शेपटीजवळ चीप बसविण्याचा विचार होता. मात्र, प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. कुत्र्यांच्या उपचारासाठी केअर सेंटर उभारण्याचेही नियोजन आहे. 

भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरण तसेच निबीर्जीकरण झाल्यानंतर त्यांच्या गळ्यात पट्टे बांधले जातील. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुमारे साडेतीन हजार पट्टे उपलब्ध करून दिले आहेत. निर्बीजीकरण केंद्रातून पहिली बॅच बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गळ्यात बेल्ट बांधले जातील. आतापर्यत 3210 कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे. 
- डॉ. विजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी 

दृष्टिक्षेप 
- कुत्र्याचे निर्बीजीकरण व लसीकरण झाल्याचे समजणार 
- आयसोलेशन जवळ निर्बिजीकरण केंद्र 
- कुत्री पकडणारी नेपाळी तरूण 

- कुत्र्यांच्या उपचारासाठी केअर सेंटर उभारण्याचेही नियोजन 

संपादन : प्रफुल्ल सुतार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT