Stress on the birth, death record department; An average of 1700 deaths per month 
कोल्हापूर

जन्म, मृत्यू नोंद विभागावर ताण ; महिन्याला सरासरी 1700 मृत्यूंचे दाखले 

डॅनिलय काळे

कोल्हापूर : कोरोना महामारीचा प्रसार होत जाईल, तशी सर्व व्यवस्था कोलमडून जात आहे. सुरवातीला रुग्णालयांवर ताण आला, उपचारासाठी प्रतीक्षा आली. रुग्णवाहिका शववाहिकांवर ताण आला. मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागली. 
महापालिकेच्या सर्वच यंत्रणेवर याचा ताण पडला आहे. जन्म मृत्यू नोंद विभागाचे कामही या महामारीने तिप्पट झाले असून, ऑगस्टमध्ये 
या विभागाने 1700 मृत्यूचे दाखले दिले. आता सप्टेंबरमध्येही सरासरी तशीच आहे. 
यापूर्वी जन्माचे दाखले जास्त आणि मृत्यूचे दाखले कमी दिले जात होते; पण आता मृत्यूच्या दाखल्यांचे प्रमाण तिप्पट झाले आहे अधिकाऱ्यासह चार ते पाच कर्मचाऱ्यांवर या विभागाला काम करावे लागत आहे. त्यातच या विभागाला जागाही अपूरी आहे. केवळ दहा बाय दहाच्या दोन खोल्यांतच या विभागाचे कामकाज चालते. त्यामुळे रेकॉर्ड जपून ठेवणे, तयार दाखले ठेवणे आणि कागदपत्रे ठेवण्याची पंचाईत होत आहे. या विभागाला मोठ्या जागेचीही गरज आहे. 

कोरोना काळात महापालिकेच्या सर्वच विभागांना जादा काम लागले आहे. आरोग्य व्यवस्थेवर तर ताण आहे. महापालिकेच्या सर्व विभागात जन्म आणि मृत्यू नोंदणी या विभागालाही महत्त्व आहे. जन्म आणि मृत्यूच्या अचूक नोंदी असणे नागरिकाच्या विविध प्रकारच्या कामासाठी आवश्‍यक असते. या विभागावर जादा जबाबदारी असते. सध्या हा विभाग अनेक अडचणीवर मात करून काम करत आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या या काळात या विभागात केवळ चार ते पाच कर्मचाऱ्यांवरच काम सुरू आहे. अहोरात्र बसून नागरिकांना दाखले दिले जात आहेत. 

केवळ 10 बाय 10 च्या दोन खोल्या 
जन्म आणि मृत्यू नोंदणी विभाग महत्त्वाचा आहे. या विभागाला रेकॉर्ड जतन करावे लागते. त्याच्या फाईली जतन कराव्या लागतात. नागरिकांना वारंवार या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्‍यकता असते. त्यामुळे हे सर्व अभिलेख नीट जपून ठेवावे लागतात, पण या विभागाचे कार्यालयच अपुऱ्या जागेत आहे. केवळ 10 बाय 10 च्या दोन खोल्यांत अधिकारी, कर्मचाऱ्यांना नीट बसायलाही जागा नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT