student visit to airport in kolhapur marathi news
student visit to airport in kolhapur marathi news  
कोल्हापूर

आपल्याच गावात रोज येणारं विमान कुठे थांबत बरं...? चला पाहुया...

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी (कोल्हापूर) - गोकुळ शिरगाव उजळाईवाडी व नेरली येथील 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी जवळच असणाऱ्या विमानतळाला भेट देऊन मनामध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता असणाऱ्या विमाने, विमानतळ व विमानतळाची व्यवस्था याबद्दल माहिती घेतली. अशा आगळ्यावेगळ्या भेटीदरम्यान मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
गावातच असले तरीही सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना येथे सुरक्षेच्या कारणास्तव सहजासहजी फिरता येत नाही .
पण अंगणवाडी सेविकांनी यावेळेस विमानतळावरच शैक्षणिक सहलीचे आयोजन करून मुलांना एका आगळ्यावेगळ्या स्थळाचे दर्शन घडविले.

मुलांची इच्छा झाली पुर्ण

विमानतळ अधिकाऱ्यांनी मुलांना विमान प्रवास, विमानातील बैठक व्यवस्था ,विमानाचे आकाशी झेप घेणे व उतरणे, त्याचबरोबर विमानतळावरील विविध सुविधा आणि विमानतळावर विकसित करण्यात येत असणाऱ्या बगीच्या बाबत माहिती दिली. कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळावरून बेळगाव, हैदराबाद, चेन्नई  अशी नियमित विमानसेवा सुरु असून एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाडीतील बालकांसाठी अशाप्रकारच्या सहलीचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका जी.आर.कांबळे यांच्यासह तीन गावच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व विमानतळावरील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT