Study of Kolhapur co-operation by representatives of various countries 
कोल्हापूर

विविध देशांच्या प्रतिनिधीकडून कोल्हापुरच्या सहकाराचा अभ्यास

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर ः येथे सर्वच क्षेत्रांत सहकाराने मोठी क्रांती घडवून आणली. पशु व दुग्धविकास, ग्रामीण विकास, वस्त्रोद्योग, ग्राहक संस्था, पतसंस्था, साखर कारखानदारी अशी अनेक क्षेत्रे आहेत. येथील सशक्त सहकारी चळवळीने विभागामध्ये केवळ आर्थिक क्रांतीच नव्हे, तर सहकार सामाजिक विकासाचे महत्त्वाचे साधन बनले आहे. कोल्हापुरातील सहकार चळवळ जगभर पोहचावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी केले. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज "एक्‍स्पोजर व्हिजिट प्रोग्राम' चे उद्घाटन करण्यात आले. 
शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि केंद्रीय कृषी व कृषक कल्याण विभाग, वाम्निकॉम व सिक्‍टॅबतर्फे सहकारविषयक व्यावसायिक प्रतिमानाचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासकांसाठी "एक्‍स्पोजर व्हिजिट प्रोग्राम" आयोजित केला आहे. याचा प्रारंभ आज ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात झाला. 
पुणे येथून वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थचे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी सहभागी झाले होते. डॉ.वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, "सहकारविषयक जाणिवा वृद्धिंगत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठीचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोल्हापूर विभागात जवळपास सर्वच क्षेत्रांत सहकाराने मोठी क्रांती घडवून आणली आहे. सहकार हे येथील सामाजिक विकासाचे महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यांचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे.' 
डॉ.संतोष सुतार यांनी आभार मानले. डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. ए. एम. गुरव यांच्यासह नेपाळ, बांगलादेश या देशांतील अभ्यासक प्रत्यक्ष उपस्थित होते. ऑनलाईन स्वरुपात नेपाळच्या नील को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या चित्रा थम्सुहांग, श्रीलंकेच्या राष्ट्रीय सहकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. असंका थिलंगरत्ने, डॉ. गणेश भाड, डॉ. जयमोहन नायर, डॉ. कल्पिता सरकार, बांगलादेशहून मोहम्मद मुर्शदुल इस्लाम आदी उपस्थित होते. 

एक्‍स्पोजर व्हिजिट प्रोग्राम 
श्रीलंका नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आदी भारताच्या शेजारी राष्ट्रांसमवेत सकारात्मक सहकार्य संबंध वृद्धिंगत व्हावेत, यासाठी केंद्रीय कृषी विभाग, वाम्निकॉम, सिक्‍टॅब आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक्‍स्पोजर व्हिजिट प्रोग्राम ऑन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॉडेल हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार (ता.5) पर्यंत हा उपक्रम चालणार आहे.

-- संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

Jintur Heavy Rain : येलदरी धरणातून २३ हजार ८०० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT