Success of Kolhapur girls in Central Public Service Commission examination 
कोल्हापूर

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरच्या मुलींचा झेंडा 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेर्ली (ता. करवीर) येथील डॉ. प्रणोती संजय संकपाळ आणि राजारामपुरीतील गौरी नितीन पुजारी यांनी यशाचा झेंडा फडकवला. प्रणोतीने दुसऱ्या तर गौरीने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. 

डॉ. प्रणोतीचे नेर्ली शालेय शिक्षण तवनाप्पा पाटणे हायस्कूलमधून झाले. तिने दहावीला ९५, तर विवेकानंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून ८९ टक्के गुण मिळविले. सांगलीतील भारती विद्यापीठातून बीडीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने २०१७ला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर खचून न जाता तिने पुन्हा अभ्यासाचे वेळापत्रक बदलले. तिने २०१९ ला झालेल्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नातच यश मिळवले. ती ५०१ रॅंकने उत्तीर्ण झाली. डॉ. प्रणोती शेतकरी कुटुंबातील असून, तिने पुण्यात अभ्यास केला. परीक्षेसाठी आवश्यक तितका अभ्यास करत सातत्याने उजळणी करण्यावर तिचा भर राहिला. तिने मुलाखतीची तयारी दिल्लीमध्ये केली.

 गौरी पुजारी राजारामपुरीतील रहिवासी असून ती २७५ रॅंकने उत्तीर्ण झाली आहे. तिसऱ्या प्रयत्नात तिने यश खेचून आणले आहे. तिचे शालेय शिक्षण उषाराजे गर्ल्स हायस्कूलमधून झाले असून तिने दहावीला ९८.७३, तर विवेकानंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेत बारावीला ९६.०५ टक्के गुण मिळविले आहेत. 
जेनेसिस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिने बी.ई. मेकॅनिकल अभ्यासक्रमात ८५ टक्के गुण मिळविले. 

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. दिल्लीत ती सहा महिने मुलाखतीच्या तयारीसाठी होती. तिचे वडील प्रा. नितीन पुजारी संजय घोडावत इन्स्टिट्युटमध्ये कार्यरत आहेत, तर आई निलजा गृहिणी आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return : वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT