Success Story Maruti Powar
Success Story Maruti Powar esakal
कोल्हापूर

जिद्दीच्या बळावर अन् चिकाटीच्या जोरावर वेटर, शेतमजुराचा मुलगा बनला 'फौजदार'; पोलिस उपनिरीक्षकपदाला घातली गवसणी

युवराज पाटील

आई नंदा पोवार रोज लोकांच्या शेतात मोलमजुरी करून दोन्ही नामदेव व मारुती पोवार मुलांना शिकवले.

दानोळी : अतिशय प्रतिकूल परिस्थिती, काळमवाडी धरणातून विस्थापित झालेले प्रकल्पग्रस्त. जमीन मिळाली पण पाणी नसल्याने जमीन पडीक, ना रोजगार अशा अवस्थेतील पोवार कुटुंब. बाप हॉटेलमध्ये वेटर, आई शेतमजूर अशा परिस्थितीत दानोळी येथे कांबळवाडी प्रकल्पग्रस्त वसाहतीमधील मारुती गणपती पोवार याने जिद्दीने पोलिस उपनिरीक्षकपदाला (Sub-Inspector of Police) गवसणी घातली आहे.

राधानगरी धरणामुळे (Radhanagari Dam) कांळबवाडी येथील अनेक कुटुंबे प्रकल्पग्रस्त झाले. साधारण १९८९ मध्ये दानोळी येथे कुटुंबे दाखल झाली. पुनर्वसन होताना अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. शेतजमीन मिळाली खरे पाणी नसल्याने शेती पडीक पडले. वडील गणपती पोवार कोल्हापूर येथे हॉटेलमध्ये वेटर म्हणून करीत होते.

आई नंदा पोवार रोज लोकांच्या शेतात मोलमजुरी करून दोन्ही नामदेव व मारुती पोवार मुलांना शिकवले. मोठा मुलगा आयटीआय व पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर सायकलने प्रवास करून एमआयडीसीत काम करून कुटुंबाला आधार देऊ लागला. लहान मुलगा बीएस्सी भौतिकशास्त्र झाला. २०१७ ला पदवीधर झालेला मारुती भावाच्या व आईच्या पाठिंब्यावर पोलिस निरीक्षक पदाची तयारी करू लागला.

सुरुवातीला कोल्हापूर येथे व नंतर घरीच त्याने अभ्यास केला. तीन वर्षांनंतर २०२० च्या बॅचमध्ये त्याने परीक्षा दिली. मुलाखतीच्या पूर्वीच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर नुकताच निकाल लागला व मारुती उत्तीर्ण झाला. त्याला आई, वडील, वडील बंधू नामदेव, मामा पांडुरंग पताडे, सरदार भित्तम, सचिन केणे, सुरेश पोवार, रणजित केणे, धणाजी केणे, सुनील पोवार यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT