bhushan patil karmala sakal
कोल्हापूर

Success Story: करमाळ्यात स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी; शेतकऱ्याला मिळाला भरमसाठ फायदा!

आण्णा काळे

Success Story: करमाळा तालुक्यातील बिटरगाव (वां) येथे कृषी भूषण दादासाहेब पाटील यांनी स्ट्रॉबेरी च्या शेती प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.आत्तापर्यंत स्ट्रॉबेरी म्हटले की महाबळेश्वर हे समीकरण सर्वांना माहिती आहे

.मात्र करमाळा तालुक्यात स्ट्रॉबेरी पीक येऊ शकते याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र कृषीभूषण दादासाहेब पाटील यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरी लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी लावलेल्या स्ट्रॉबेरीला उत्कृष्टरित्या फळे लागले असून सध्या त्यांच्या स्ट्रॉबेरीला तीनशे रुपये किलो भाव मिळत आहे. सव्वा एकर स्ट्रॉबेरीच्या शेतीतून साधारणपणे 20 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

करमाळ्यात स्ट्रॉबेरी आल्याने सर्वांना आश्चर्य वाटत असून सध्या अनेक भागातून स्ट्रॉबेरी शेती पाहण्यासाठी शेतकरी येत आहे. राज्य शासनाच्या वतीने सेंद्रिय शेतीतील कृषी भूषण पुरस्कार दादासाहेब पाटील यांना देण्यात आला असून याशिवाय विविध संस्थांचे त्यांना सहा पुरस्कार मिळाले आहेत.

येथे लावलेल्या स्ट्रॉबेरी

दादासाहेब पाटील यांनी 25000 स्ट्रॉबेरीची रोपे लावली आहेत .यासाठी तीन बाय तीन फुटावरती बेड काढण्यात आले आहेत. एका बेडवरती सहा ओळी असुन एक फुटाच्या अंतराने सहा ओळी लावण्यात आले आहेत. तर दोन बेड मधील अंतर तीन फूट आहे अशी एकूण 25 हजार रुपये लावले आहेत.

आठ रुपयाला एक रूप खरेदी केले आहे. स्ट्रॉबेरी ची सर्व रोपे महाबळेश्वर येथून त्यांनी आणली आहेत. एका स्ट्रॉबेरीच्या झाडाला एक ते दीड किलो स्ट्रॉबेरी चे उत्पन्न अपेक्षित आहे. स्ट्रॉबेरीला थंड हवामानाची गरज असते बिटरगाव वा हे गाव उजनीच्या काठावरती असून दादासाहेब पाटील यांनी लावलेल्या स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या चारही बाजूने केळी आहे त्यामुळे स्ट्रॉबेरी साठी पोषक वातावरण मिळाले आहे येणाऱ्या दिवसात वाढणारे ऊन लक्षात घेऊन श्री पाटील यांनी सर्व स्ट्रॉबेरी च्या शेती वरती स्प्रिंकलर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या स्ट्रॉबेरी चे 200 ग्रॅमचे पॅकिंग तयार केले जात असून पुणे व मुंबई येथील अनेक मॉलमध्ये या स्ट्रॉबेरीला मागणी आहे याशिवाय करमाळा, टेंभुर्णी, कंदर येथे स्ट्रॉबेरी विक्रीचे स्टॉल सुरू करण्यात आले असून शेतकरी ते ग्राहक या योजनेअंतर्गत ही विक्री सुरू आहे.

मी माझे महाबळेश्वरचे मित्र वसंत भिलारे यांची स्ट्रॉबेरी शेती पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी वसंत भिलारे व माझी चर्चा झाली आणि करमाळ्यात स्ट्रॉबेरी येईल का ?असा प्रश्न मी त्यांना केला.तेव्हा त्यांनी ही स्ट्रॉबेरी तुमच्याकडेही येईल असे सांगितले त्यानंतर मी स्ट्रॉबेरी लावण्याचा निर्णय घेतला सध्या अडीच एकर शेतामध्ये मिस्ट्रोबेरी लावली आहे. बाजारामध्ये 300 रुपये किलो ने सध्या स्ट्रॉबेरी विक्री होत असून आपण करमाळ्या सारख्या भागात स्ट्रॉबेरी पिक उत्तम रीतीने पिकवू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.स्ट्रॉबेरी शेतीतून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळत आहे. माझ्यासोबत माढा तालुक्यातील फूड जळगावचे माझे मित्र दीपक शंकर यांनी देखील स्ट्रॉबेरी लावलेली आहे

कृषिभूषण दादासाहेब पाटील बिटरगाव (वां),ता. करमाळा जि. सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT