Sugarcane labour Gangs esakal
कोल्हापूर

माणुसकी अजूनही जिवंत आहे! शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेण्याचा ऊसतोड मजुरांचा निर्णय, सर्वत्र होतंय कौतुक

एका एका शेतकऱ्याचे हजारो रुपये घेऊन एक टोळी तीन महिन्यांत लाखो रुपये कमवत आहे.

कुंडलिक पाटील

शेतकऱ्यांची ही अडचण पाहून म्हारुळ येथील तरुणांनी एक ऊसतोड टोळी केली. गेली दोन वर्षे ते ऊस तोडणीचे काम करतात.

कुडित्रे : उसाचा (Sugarcane) उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी (Farmer) मेटाकुटीला आला असताना, ऊसतोड मजूर शेतकऱ्यांची लूट करत आहेत. एका साडग्याला, ट्रॉलीला बाराशे रुपये ते पंधराशे रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात. शेतकऱ्यांची ही अडचण पाहून म्हारुळ (ता. करवीर) येथील ऊसतोडपे मजूर टोळीने शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेता ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या तरुणांचा, तोडप्यांचा आदर्श निर्माण झाला असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. गावागावात तरुण साखर कारखान्याला ऊसतोडणीचे काम करू लागले आहेत. या हंगामात सुरुवातीपासूनच टनाला शंभर रुपये, एका ट्रॉलीला बाराशे रुपये ते पंधराशे रुपये शेतकऱ्यांकडून घेत आहेत. शेतकरी ऊसतोड होऊ दे किंवा मनुष्यबळ नसल्यामुळे या ऊस तोडणाऱ्या टोळीला पैसे देतात.

एका एका शेतकऱ्याचे हजारो रुपये घेऊन एक टोळी तीन महिन्यांत लाखो रुपये कमवत आहे. ऊस उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडत आहे. शेतकऱ्यांची ही अडचण पाहून म्हारुळ येथील तरुणांनी एक ऊसतोड टोळी केली. गेली दोन वर्षे ते ऊस तोडणीचे काम करतात. शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी एक रुपया सुद्धा ते घेत नाहीत. चहासुद्धा देऊ नका म्हणतात आणि उसाचे वाढे सुद्धा योग्य पद्धतीने तोडतात.

यामुळे या तरुणांच्या मागे शेतकरी आपला ऊस तोडावा म्हणून विनवणी करता करत आहेत. दरवर्षी ही टोळी १००० टन ऊस तोडते. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाचतात. या ऊस तोडपे टोळीमध्ये विश्वास पाटील, कृष्णात पाटील ,बाजीराव चौगले, दीपक पाटील ,राजाराम चौगले, ओमकार चौगले ,गजानन पाटील,बाजीराव चौगले या तरुणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT