sugarcane sugar mill kolhapur maharashtra
sugarcane sugar mill kolhapur maharashtra 
कोल्हापूर

अल्पभूधारक शेतकऱ्यांची ऊसतोडीत फरफट 

सकाळ वृत्तसेवा

वडणगे (कोल्हापूर) : यंदा उसाचे बंपर उत्पादन आहे. त्या प्रमाणात साखर कारखान्याकडे ऊस तोडीची यंत्रणा नाही,जी आहे ती, बड्या शेतकऱ्यांचा ऊसतोडीसाठी दिली जाते. ऊस लागणीच्या नोंदणीनुसार झालेल्या पाळीपत्रकाचा बोजवारा उडला आहे. त्यामुळे अल्पभूधारक सभासद शेतकरी ऊसतोडीसाठी कारखान्याच्या कार्यालयात रोज हेलमाटे मारत आहे.

आज उदया असे शेतकऱ्यांना सांगून कारखाना प्रशासन टोलवाटोलवी करत आहे.ऊसतोडीसाठी कारखान्याच्या गट कार्यालयात सभासद शेतकऱ्यांसह, बिगर सभासदांची रोज गर्दी असते.'साहेब, तोडणीचा तारीख होवून गेली, कधी ऊस तोड देता, अशी विचारणा शेतकरी चिटबॉय व सर्कल इनचार्जकडे करत आहेत. यंत्रणा कमी आहे. आज- उद्या देता असे शेतकऱ्यांना सांगून ते वेळ मारून नेतात. एकीकडे असे चित्र असले तरी दुसरीकडे कारखान्याच्या हायकमांडशी असलेल्या संबंधामुळे बडया शेतकऱ्यांनी वजन वापरून आपलाच ऊसतोडणीसाठी यंत्रणा लावल्याचे दिसते. अल्पभूधारक शेतकरी मात्र आज तोड येईल उद्या येईल या आशेवर आहे. 

 मोठे शेतकरी पैसे देवून ऊस तोडून घेतात. लहान शेतकऱ्यांना स्वत: ऊस तोडा व कारखान्याला पाठवा, असे सांगितले जाते शेतकऱ्यांनी ऊस लावायचा व तो तोडून कारखान्यांना पाठवायचा हा कुठला न्याय 
-रमेश कुंभार , शेतकरी. 

कारखान्यांकडून बडया शेतकऱ्यांना लगेच ऊसतोड दिली जाते. सभासद शेतकऱ्यांच्या नावावर अनेक बिगर सभासद ऊस पाठवतात. पाळीपत्रकात घोळ करून कमी क्षेत्र असलेल्या काही सभासद शेतकऱ्यांच्या नावावर जादा ऊस कसा काय ?   
- राहूल जाधव, शेतकरी. 


संपादन - धनाजी सुर्वे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT