sugarcane workers leader kolhapur shirol 
कोल्हापूर

वाहनधारकांना फसवणारे ऊसतोड मुकादम जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा

शिरोळ - शिरोळ व अर्जुनवाड येथील तीन वाहनधारकांना ऊसतोड मजूर पुरवितो असे सांगून सुमारे 30 लाख रुपयाचा गंडा घालून वर्षापासून पसार झालेल्या तीन मुकादमांना जेरबंद करण्यात शिरोळ पोलिसांना यश आले आहे. 

अर्जुनवाड येथील प्रशांत पाटील यांना ऊसतोड मजुरांची टोळी पुरवितो म्हणून सुखदेव रावण बरडे (डोंगरपिंपळा, ता. आंबेजोगाई) याने 8 लाख 75 हजार रुपये घेतले. मात्र मजुरांची टोळी न पुरविता तो पसार झाला होता. शिरोळ येथील उत्तम छानदेव देशमुख यांनाही टोळी देतो असे सांगून संशयित भास्कर रोहिदास राठोड (बेलोरे, ता. जिंतूर) याने 12 लाख रुपये घेऊन पसार झाला होता. अर्जुनवाड येथील विठ्ठल पाटील यांच्याकडून 8 लाख रुपये घेऊन राजेंद्र महादेव गुगवाड (शेड्याळ, ता. जत) पसार झाला होता. 

सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ सुळ, ज्ञानेश्‍वर सानप, हणुमंत माळी, ताहीर मुल्ला यांच्या पथकाने विविध ठिकाणांहून, बरडे, राठोड व गुगवाडे या मुकादमांना पकडले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Gokul Election : गोकुळमध्ये महायुतीचा १५०० मताधिक्याने विजयी होणार; माजी अध्यक्ष विश्वास पाटलांचा दावा; ‘शपथेचा खेळ पूर्वीपासूनच’; सतेज पाटलांचे नाव न घेता प्रत्युत्तर

Car Accident: नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिसांच्या पथकाला कारची धडक; PSI चा मृत्यू, ११ हून अधिक जण गंभीर

Jio Platforms IPO: भारताच्या डिजिटल क्रांतीत मोठी संधी; 5G, ब्रॉडबँड आणि AI वर विकासाची भिस्त

Uttarakhand: मसूरीत अक्षय कुमार, नैनितालमध्ये जाह्नवी कपूर; उत्तराखंड बनतेय बॉलिवूडचे शूटिंग डेस्टिनेशन

Pradeep Purnekar: 'आता तुझा नंबर', प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील आणखी एका सदस्याला जीवे मारण्याची धमकी, ठाण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT