कोल्हापूर : जिल्ह्यातील 11 हजार 500 ऊस तोड मजूर आणि कामगारांना आपआपल्या जिल्ह्यात रवाना करण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना सुखरुप आणि त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांची योग्य ती तपासणीही केली जाणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सांगितले. दोन दिवसात हे सर्व कामगार आपआपल्या जिल्ह्यामध्ये पोहचतील, असे पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले,""मजूर आपल्या गावात पोचल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी होईल. तेथील प्रशासन त्यांची काळजी घेईल. त्याचबरोबर परराज्यातील 2 हजार 500 कामगारांची जिल्ह्यातील निवारागृहांमध्ये व्यवस्था केली आहे. त्यांना सोडण्यासाठी केंद्र सरकार निर्णय घेईल. त्यानुसार त्यांनाही पाठवले जाईल.''
प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे म्हणाले,""शरद साखर कारखान्याचे 738 मजूर रवाना झाले. जवाहर सहकार साखर कारखाना, गुरुदत्त साखर कारखाना आणि दत्त सहकारी साखर कारखाना स्थळावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत वाहन तपासणी सुरु असून संध्याकाळपर्यंत या कारखान्याचे मजूरही आप-आपल्या गावी रवाना होतील.''
जालना, बीड, परभणी अशा इतर जिल्ह्यातील हे ऊस तोडणी मजूर आहेत. या व्यतिरिक्त 2 हजार 500 परराज्यातील कामगार शिबिरांमध्ये आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या परवानगीने जिल्ह्यातील कामगारांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. शरद सहकारी साखर कारखान्याच्या एकूण 738 पैकी 225 कामगारांना 10 एसटी वाहनातून आज त्यांच्या जिल्ह्यांकडे रवाना झाले आहेत. शरद कारखान्याचे 738 मजुर रवाना झाले. महाराष्ट्र राज्य एसटी बस, टेम्पो, ट्रक्स अशा वाहनांमधून ऊसतोड मजूर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी यंत्रणा रवाना झाली.
दरम्यान, हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या 90 ऊसतोड मजुरांना घेऊन तीन एसटी बसेस बीड जिल्ह्याकडे रात्री उशिरा रवाना झाल्या.
कागलमधून तीन बसेस रवाना...
ऊस तोडणी मजूर गावी सोडण्यासाठी काल ताटकळलेल्या तीसपैकी तीन एसटी गाड्या आज कागल आगारातून बाहेर पडल्या. जवाहर साखर कारखान्यातील ऊसतोडणी मजूरांसाठी या गाड्या पाठविण्यात आल्या. प्रत्येक गाडीत 23 प्रवाशी घेऊन या गाड्या बीड जिल्ह्यात जाणार आहेत. काल कागल आगाराने 30 बसेस आणि 80 कर्मचारी तयार ठेवल्या होत्या. निर्णय न झाल्यामुळे एसटीसह चालक वाहक व कर्मचारीही ताटकळले होते. मात्र, आज वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तीन बसेस चालक व वाहकासह आगारातून बाहेर पडल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.