Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : 'सुरेखाला हाक मारली, पण..'; उपसरपंचांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

अनिल पाटील हे गावचे उपसरपंच आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कळे पोलिसात (Kolhapur Police) नोंद झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

पुनाळ : आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील उपसरपंच अनिल पाटील यांच्या पत्नीने‌ राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरेखा ऊर्फ स्वाती अनिल पाटील (वय ४०) असं त्यांचं नाव आहे.

याबाबत कळे पोलिसात (Kolhapur Police) नोंद झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अनिल पाटील हे गावचे उपसरपंच आहेत. शिवाय ते काटेभोगाव (ता.पन्हाळा) येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक आहेत.

शनिवारी (ता. १२) सकाळी शाळा करुन अनिल पाटील गावी गेले. अनिल हे हॉलमध्ये तर पत्नी सुरेखा या बेडरुममध्ये विश्रांती घेत होत्या. दुपारी एकच्या सुमारास अनिल पाटील यांनी पत्नी सुरेखा यांना हाक मारली पण प्रतिसाद मिळाला नाही.

बराच वेळ झाल्यानंतर शेजारच्या लोकांना बोलावून दरवाजा तोडला. त्यावेळी सुरेखा यांनी छताच्या हुकाला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सुरेखा यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT