Sulkud Water Scheme Dispute esakal
कोल्हापूर

सुळकूड पाणी वाद पेटला; इचलकरंजीला दूधगंगेतून एक थेंबही पाणी मिळणार नाही; राजेंद्र यड्रावकरांचा स्पष्ट इशारा

सुळकूड पाणी योजनेला तीव्र विरोध; दत्तवाड, घोसरवाडसह पाच गावांत कडकडीत बंद

सकाळ डिजिटल टीम

इचलकरंजीला खरेच पाण्याची गरज आहे का की राजकारणासाठी सुळकूड पाणी योजना आहे हे तेथील राजकर्त्यांनी स्पष्ट करावे.

कुरुंदवाड : इचलकरंजी (Ichalkaranji) शहरासाठी दूधगंगा नदीतून (Dudhganga River) पाणीपुरवठ्याची सुळकूड पाणी योजना (Sulkud Water Scheme) रद्द करावी, यासाठी दत्तवाडसह घोसरवाड, टाकळीवडी नवे दानवाड, जुने दानवाड येथील सर्व व्यवहार बंद करून ग्रामस्थांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला.

याबरोबरच या पाच गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी दत्तवाड येथील गांधी चौक येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. दूधगंगा बचाव कृती समिती दत्तवाड आयोजित पाच गावचे लोकप्रतिनिधी, कर्नाटकाच्या बोरगाव, मलिकवाड, सदलगा, तसेच सांगाव, सुळकूड, वंदूर, कागल, बिद्री, येथूनही लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरोळ तालुक्यातील सगळ्या पक्षाच्या, गटाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दरम्यान, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बंदला पाठिंबा देतानाच इचलकरंजी शहरास दूधगंगेतून एक थेंबही मिळणार नाही. त्यांनी दूधगंगेच्या पाण्याचा अट्टाहास सोडावा व पंचगंगा प्रदूषणमुक्त करूनच इचलकरंजीला पाणी द्यावे, असे सांगितले.

दूधगंगा बचाव समितीच्या वतीने सुळकूड योजना तत्काळ रद्द करण्याबाबतचे निवेदन आमदार यड्रावकर यांना देण्यात आले. आमदार यड्रावकर म्हणाले, ‘कृष्णा योजनेची गळती इचलकरंजी रोखू शकत नाही. त्यामागचे अर्थकारण तपासण्याची आवश्यकता आहे.

इचलकरंजीला खरेच पाण्याची गरज आहे का की राजकारणासाठी सुळकूड पाणी योजना आहे हे तेथील राजकर्त्यांनी स्पष्ट करावे. शुद्ध पाणी हा सर्वांचा अधिकार आहे. पण पंचगंगा प्रदूषित करून इचलकरंजीकरांनी शिरोळ तालुक्यातील टाकवडेपासून सर्व गावांना दूषित पाणी दिले आहे याचीही जाणीव ठेवावी. त्यामुळे दूधगंगा योजनेतून इचलकरंजीकरांना एक थेंब पाणी मिळणार नाही.’

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, भवानीसिंह घोरपडे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अॅड. सुशांत पाटील यांनीही इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी देण्यास विरोध असल्याचे सांगितले. यावेळी बाबासाहेब पाटील, अण्णासोा हावले, धनराज घाटगे, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील अमोल शिवई, मनोज कडोले, सागर कोडेकर, ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, दीपाली परीट, मिनाज जमादार, बाबासोा वनकोरे, नवे दानवाडचे सरपंच सी. डी. पाटील, नितीन बागे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी केले. आभार संजय पाटील यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT