File photo sakal
कोल्हापूर

कोथळी: जबरी चोरीच्या परिसरात पोलिस अधिक्षकांची पाहणी

जबरी चोरीच्या परिसरात अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, डिवायएसपी रामेश्वर वैजाने, पो.नि.राजेंद्र मस्के यांनी पाहणी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जयसिंगपूर : कोथळी (ता. शिरोळ) येथे दोन ठिकाणी जबरी चोरीच्या घटनांनी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनिल कुमगोंडा पाटील व मौला खुदबूदिन मुजावर यांच्या घरात मंगळवारी पहाटे तीन चोरट्यांनी जबरी चोरी केली. यात बबिता पाटील या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसडा मारून नेला. तर मौला मुजावर यांचे घर फोडून तीन हजार रूपयाची रोकड अशी एकुण सतरा हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.

पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, कोथळी येथील दानोळी मार्गावर प्रथम सागर पाटील यांचे राहत्या घरात तीन चोरट्यांनी दरवाजा ढकलून प्रवेश केला. आई बबिता पाटील यांच्या गळ्यातील दहा हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसडा मारून नेले. त्याचबरोबर संदेश व श्रीवर्धन पाटील यांची शैक्षणिक कागदपत्रे ही चोरट्यांनी लंपास केली आहेत. त्यानंतर चोरट्यांनी हरिपूर रोडवरील मौला मुजावर यांच्या घराची कडीकोयंडा कापून काढून घरातील प्लॉस्टिक भिशीतील तीन हजाराचा मुद्देमाल लंपास केला.

घटनास्थळी अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, डिवायएसपी रामेश्वर वैंजणे, पो.नि.राजेंद्र मस्के यांनी पाहणी केली. त्याचबरोबर श्वान व ठस्से तज्ञांना पाचारण करण्यात आले. दरम्यान तीन चोरटे गावातील एका सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे जयसिंगपूर पोलिसांनी तपासासाठी पथके तैनात केली आहेत. दानोळी येथेही काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरीला गेल्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT