Supply of Corona material from Health Mission stopped 
कोल्हापूर

'आरोग्य अभियानाकडून कोरोना साहित्याचा पुरवठा बंद' 

सदानंद पाटील

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय योजनांतर्गत जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून विविध प्रकारची साधनसामग्री, साहित्य, औषधे आदी खरेदी करण्यात आली. हे साहित्य सर्व शासकिय आरोग्य संस्था, शासकिय कार्यालये, अन्य सहयोगी आरोग्य विषयक संस्था यांना पुरवण्यात येत आहे. मात्र 5 ऑक्‍टोबरनंतर जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य संस्था व जिल्हा परिषदेकडील शासकीय यंत्रणा वगळता अन्य संस्थाना हे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार नाही, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. 

कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात साठ्याची उपलब्धता व निधी नियोजन याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानुसार सर्वच संस्थांना जिल्हा परिषदेकडून साहित्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र 5 ऑक्‍टोबर पासून जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून केवळ जिल्हा परिषदेच्या अधिनस्त संस्थांनाच कोरोनाच्या अनुषंगाने साहित्य पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात उर्वरित संस्थांनी कोरोना प्रतिबंध व उपचारासाठी आवश्‍यक साहित्य, साधनसामग्री, औषधे इ. उपलब्ध करुन घेणे, व आवश्‍यक साठा करणे याबाबतीत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातुनही जर कोणी नियोजन केले नसेल तर पुढील 15 दिवसात हे नियोजन करावे. 

सर्वच आरोग्य यंत्रणांनी 30 सप्टेंबरपर्यंत त्यांच्याकडे कोरोनाच्या अनुषंगाने साठा उपलब्धतेसंदर्भात आवश्‍यक कार्यवाही करावी व आपले अधिनस्त आरोग्य संस्थेत दाखल होणारे रुग्ण/ आपल्या अधिनस्त कर्मचारी यांना आवश्‍यक साठा उपलब्ध होईल याची दक्षता घेण्याचे आवाहनही श्री.मित्तल यांनी केले आहे. याबाबत सर्व संबधित यंत्रणा उदा. महापालिका आयुक्‍त, पोलिस अधिक्षक, अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद/नगरपालिका यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री.मित्तल यांनी केले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT