गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील 89 पैकी 72 गावांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आरोग्य सेतू ऍपद्वारे 36 गावे हॉटस्पॉट म्हणून घोषित झाली आहेत. या गावांमध्ये विशेष पथकाद्वारे वॉरपुटिंगवर सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यावर ही जबाबदारी दिली असून संशयितांना तत्काळ स्वॅबसाठी पाठविण्यात येत आहे, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ""जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्वच गावांत सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 450 प्राथमिक शिक्षक, 384 अंगणवाडी शिक्षिका, 192 आशा स्वयंसेविका व 271 मदतनीसांची नेमणूक केली आहे. सर्व्हेसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला 22 थर्मल गन, 22 पल्स ऑक्सिमीटर दिले आहेत. प्रत्येक आशा स्वयंसेविकांना पल्स ऑक्सिमीटर दिले आहेत. उपकेंद्रालाही हे साहित्य पुरवले आहे. हॉटस्पॉट गावांमध्ये सर्व्हेची कार्यवाही जलदगतीने सुरू आहे. प्रत्येक गावातील सुपर स्प्रेडरची यादी तयार केली असून त्यांचे स्वॅब घेण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येत आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे. आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी यांना बाधिताच्या प्रथम व द्वितीय संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची सूचना केली आहे. प्रथम संपर्कातील लोकांना कोविड सेंटरला स्वॅबसाठी पाठविले जाते. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून आतापर्यंत दीड लाखाचा दंड वसूल केला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावागावांत सोडियम हायपोक्लोराईडने फवारणी सुरू आहे.
स्वच्छतेवर भर देण्यात येत असून पॉझिटिव्ह रुग्णांचे घर व हाय रिस्क व्यक्तींच्या घर व परिसरात फवारणी केली जात आहे. ग्रामसंस्कार वाहिनीवरून जनजागृतीवर भर दिला जात आहे. रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तालुक्यातील पाच वर्षांवरील सर्व जनतेसाठी अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथीकच्या 1 लाख 98 हजार गोळ्यांचे बॉटल्स मिळाले असून त्याचे वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे. याशिवाय कणेरी मठाच्या बुस्टर डोसचे हॉटस्पॉटच्या गावांमध्ये वाटप करण्यात येत आहे. यावेळी सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर उपस्थित होते.
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.