swabhimani shetkari sanghatana protest against central government 
कोल्हापूर

मुर्दाड सरकारला जागं करण्यासाठी स्वाभिमानीचा जागर 

सुनील पाटील

कोल्हापूर : मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक रद्द करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उद्या (गुरुवार) सायंकाळी 7 ते शुक्रवारी (ता. 4) सकाळी 7 पर्यंत रात्रभर भजन, किर्तण करत आत्मक्‍लेश करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकरी तर येतीलच पण ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले पाहिजेत असे वाटते त्यांनीही या मुर्दाड सरकारला जागं करण्यासाठीच या आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन श्री शेट्टी यांनी केले आहे. 

श्री शेट्टी म्हणाले, दिल्लीत गेल्या सात दिवसपासून लाखो शेतकरी कुडकूडत बसले आहेत. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले. लाठीमार केला. तरीही ते शेतकरी जागचे हलले नाहीत. त्यांची केवळ एकच मागणी आहे, की सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी तीन कृषी विधेयक केले आहे. ते तात्काळ रद्द करावेत. शेतकऱ्यांना अदाणी आणि अंबानींचे गुलाम करु नका. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कृषी मालाला हमी भाव मिळाला पाहिजे किंवा त्याचा दर ठरवण्याची मुभा शेतकऱ्यांच द्या, अशी मागणी केली जात आहे. मात्र, हे आंदोलन शिखांचे आहे. खलिस्तानवाद्यांचे आहे. असे म्हणून शेतकऱ्यांना हिनवले आहे. या आंदोलनाला प्रांतीय आणि राजकीय रंग दिला आहे. पण सरकारने शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणू नये. त्यांना त्यांच्या हक्काची शेती करु द्यावी, अशी मागणी श्री शेट्टी यांनी केली. कायद्याने बंधनकारक असणारा हमी भाव मिळावा. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रत्येकाला या आंदोलनात जावे असे वाटते. आपण जावू शकत नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी आत्मक्‍लेश आंदोलन केले जाईल. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाईल. संध्याकाळचे जेवण घेवूनच शेतकरी हे आंदोलन करतील. रात्रभर भजन, किर्तन करत आत्मक्‍लेश केला जाईल, असेही शेट्टी यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT