Symbolic a agitation against the government in front of the Collector office by the entire Maratha community
Symbolic a agitation against the government in front of the Collector office by the entire Maratha community 
कोल्हापूर

कोल्हापुरात मराठ्यांचा आंदोलनाचा प्रयत्न अयशस्वी : पोलिसांनी घेतले ताब्यात

संदीप खांडेकर

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरुद्ध प्रतिकात्मक श्राद्ध आंदोलनाचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही. पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पोलिस भरती प्रक्रिया थांबलीच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे समाजात अस्वस्थतेचे वातावरण आहे. विविध आंदोलनात समाज असंतोष व्यक्त करत आहे विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाजाने समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक श्राद्ध आंदोलनाचे आयोजन केले होते.

दुपारी साडेबारा वाजता महावीर उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून आंदोलक चालत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. एक मराठा लाख मराठा, पोलिस भरती थांबली पाहिजे, मराठा विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी सरकारने घ्यावी, सारथीचे पुनर्जीवन होऊन एक हजार कोटी रुपये अनुदान द्यावे, मराठा द्वेषी सरकारचा निषेध, या आशयाचे फलक त्यांच्या हातात होते.

 
प्रवेशद्वारासमोर येताच आंदोलकांनी ठिय्या मारला. प्रतिकात्मक श्राद्ध घालण्याची तयारी सुरू केली. याच वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांसह महिलांना ताब्यात घेतले. दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्नील पार्टे, रवींद्र मुदगी, शैलेश जाधव, ऋषीकेश मराठे, केदार चौगुले, ऋषीकेश कारंजे, राजेंद्र चव्हाण, पापा प्रभावळे, उत्तम पोवार, प्रथमेश नलवडे, स्नेहा चव्हाण, धनश्री तोडकर, रेणुका तोडकर, समरजित तोडकर, अभिजित सावंत यांचा आंदोलनात सहभाग होता.

संपादन - अर्चना बनगे

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT