कोल्हापूर: टाकाळा परीसरातील जमादार यांच्या घरात गॅस स्फोट झाल्यामुळे घराची कौले उडुन गेली व घरातील साहीत्याचे नुकसान झाले. sakal
कोल्हापूर

क्षणात होत्याचे नव्हते झाले! गॅस सिलिंडर स्फोटात दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder Blast) गळतीने आज सकाळी झालेल्या स्फोटात दोघे जखमी झाले. राजारामपुरी (Rajarampuri) दुसरी गल्ली टाकाळा (Takala) परिसरात ही घटना घडली. घटनेत मोईनुद्दीन जमादार (वय ७०) आणि रियाज जमादार (५५) अशी जखमींची नावे आहे. त्यांना सीपीआर मध्ये दाखल केले आहे. घटनेत कच्च्या घराच्या दोन्ही भिंती आणि छप्पर उडाल्याने परिसरात घबराट पसरली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना सीपीआर मध्ये दाखल केले. घटनेत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अग्नीशमन दलाकडून सांगण्यात आले.

ताराराणी विद्यापीठाच्या पूर्व बाजूस असलेल्या टाकाळा परिसरात राजारामपुरी दुसऱ्या गल्ली परिसरात आज साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अग्नीशमन दलाला ही माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोचले. तेंव्हा घराचे छप्पर, दोन भिंती पडल्याचे आढळून आले. तसेच घरी असलेल्या मोईनुद्दीन आणि रियाज हे दोघे जखमी झाले. त्यांच्या अंगावर छप्परचा आणि भिंतींचा काही भाग पडल्यामुळे ते जखमी झाले होते.

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे झालेल्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील नागरिकांनी तेथे मदतीसाठी प्रयत्न केले. याच दरम्यान तेथे पोचलेल्या प्रभारी अधिकारी जयवंत खोत, जवान वामन चौरे, मधुकर जाधव, केरबा निकम, अवधूत चव्हाण, चालक उमेश जगताप यांनी जखमींना बाहेर काढून सीपीआर मध्ये दाखल केले. या घटनेत साधरण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून याचा पंचनामा ही अग्नीशमन जवानांनी केला आहे. घर कच्च्या बांधकामाचे असल्यामुळे छप्पर पूर्णपणे उडून गेले असून प्रापंचिक साहित्याही अस्ताव्यस्थ फेकले गेले. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली आहे, याचाही तपास सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT