Talim for Innovative Initiatives 
कोल्हापूर

नावीन्यपूर्ण उपक्रमाची  तालीम

संभाजी गंडमाळे : वृत्तसेवा

कोल्हापूर : एखाद्या तालीम संस्थेने शाळा सुरू करणे आणि ती दीर्घकाळ चालवण्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे रविवार पेठेतील सोनटक्के तालीम. तालमीची स्थापना 1911 ची. मात्र, 1941 मध्ये या तालमीची अधिकृत नोंदणी झाली. शेलाजी वनाजी विद्यालय, नवयुग हायस्कूल अशा शाळांची स्थापना या तालमीतूनच झाली. शिक्षणाबरोबरच कुस्ती, व्यायामशाळा, फुटबॉल, मर्दानी खेळाचा आखाडा अशा सर्वच क्षेत्रांत तालमीने वेगळा ठसा उमटवला आहे. 

मोरेश्‍वर व गुरुनाथ सोनटक्के यांनी तालमीला बक्षीसपत्र करून जागा दिली आणि तेथे तालमीची इमारत उभी राहिली. शहराच्या मध्यवर्ती भागात एवढी मोठी जागा असणारी ही तालीम. साहजिकच हा परिसर एक शैक्षणिक संकुलच बनला आहे. त्याशिवाय तालमीचा लाल आखाडा बंद झाला असला तरी व्यायामशाळेतून परिसरातील तरुणांची मनगटं मजबूत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 1955 मध्ये तालमीने ऍथलेटिक्‍समध्ये जनरल चॅम्पियनशीप मिळवली होती. गणेशोत्सव, शिवजयंती, त्र्यंबोली यात्रा आणि हनुमान जयंती हे तालमीचे प्रमुख उत्सव. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भव्य देखाव्याची तालमीची पूर्वी परंपरा. 1957 मधील गणेशोत्सवात झाशीच्या राणीच्या शौर्यावर आधारित देखावा तालमीने केला होता. या देखाव्याच्या निमित्ताने सलग तीन महिने तालमीचे कार्यकर्ते परिश्रम घेत होते. 1974 मध्ये तालमीने शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित भव्य चित्ररथ साकारला होता. त्याला विविध पारितोषिके मिळाली होती, असे आजही तालमीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात. 

पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश आगमनाची परंपरा तालमीने जपली आहे. अंगणवाडीसाठीही हॉल उपलब्ध करून दिला असून, एका अपंग संस्थेला दोन खोल्या माफक भाड्यामध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. परिसरातील महिला व मुलींसाठी विविध उपक्रम तालमीतर्फे नेहमीच घेतले जातात. 

मर्दानी खेळ अन्‌ तरुणाई 
बैलगाडीच्या शर्यती पूर्वी तालमीतर्फे व्हायच्या. त्याशिवाय कुस्तीतही तालमीचा लौकिक होता. मात्र, काळाच्या ओघात आता येथील कुस्तीचा आखाडा बंद करावा लागला. मर्दानी खेळाची जुनी परंपराही तालमीने जपली आहे. नव्या पिढीने या खेळांच्या जतन व संवर्धनासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असून, रोज तीसहून अधिक शाळकरी मुले व तरुण येथे सराव करतात. महापूर असो किंवा नुकत्याच झालेल्या लॉकडाउनच्या काळात तरुणाईने गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आजही येथील तरुणाईने गरजूंच्या मदतीसाठी दातृत्वाचा हात पुढे केला आहे. 

तालमीने पहिल्यापासून शिक्षणाचा वारसा जपला. शेलाजी वनाजी विद्यालय, नवयुग हायस्कूल असो किंवा अलिकडच्या काळात संगणक प्रशिक्षणावरही तालमीने भर दिला. नव्या पिढीने आता विविध सेवाभावी उपक्रमांबरोबरच नावीन्यपूर्ण संकल्पनावर भर दिला आहे. 
शामराव शिंदे, अध्यक्ष, सोनटक्के तालीम  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: सूर्यकुमार-शिवम दुबेही मुंबईसाठी खेळणार की नाही? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Latest Marathi News Live Update : लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत - दलवाई

Bangladesh Hindu Youth Murder Reason : बांगलादेशातील हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येमागचे खरे कारण अखेर आले समोर!

Mumbai: राज्यात दोनच विमानतळांना प्रेरणादायी नावे, पण कोणत्या? अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

SCROLL FOR NEXT