tallest national flag in inda was finally flown in belgum 
कोल्हापूर

व्हिडीओ : देशातील सर्वात उंच 'हा' राष्ट्रध्वज अखेर फडकला....

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - दुरूस्ती काम हाती घेतल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी येथील किल्ला तलावाजवळील राष्ट्रध्वज अखेर फडकला. देशातील सर्वात उंच असा नावलौकीक असलेल्या या ध्वजाच्या स्तंभाची दुरूस्ती 10 जून रोजी सुरू करण्यात आली होती. आठवडाभरातच दुरूस्तीचे काम पूर्ण झाले, पण ध्वज फडकविण्यात पाऊस व वाऱ्याचा अडथळा येत होता. त्यामुळे प्रात्यक्षीक घेण्यात आले नव्हते. गेल्या चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. वाऱ्याचा जोरही कमी झाला आहे. त्यामुळे बुधवारी (ता.24) प्रात्यक्षीक घेण्याचा निर्णय झाला. ध्वजस्तंभ दुरूस्तीसाठी आलेले तंत्रज्ञ व महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षीक घेण्यात आले. स्वयंचलीत यंत्राद्वारे ध्वज स्तंभावर चढविण्यात आला, सहा मनिटानंतर ध्वज फडकला. प्रात्यक्षीक झाल्यानंतर ध्वज पुन्हा उतरविण्यात येणार होता पण पाऊस व वारा नसल्यामुळे बुधवारी दिवसभर तो न उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी दिवसभर ध्वज डौलाने फडकत होता.

बेळगावातील हा ध्वज बजाज इलेक्‍ट्रीकल्स या कंपनीने उभारला आहे. दोषदायीत्व कालावधी अद्याप पूर्ण न झाल्याने ध्वज व स्तंभाची दुरूस्ती करण्याची जबाबदारी कंपनीवरच आहे. 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताकदिनी हा ध्वज फडकविण्यात येणार होता. पण ध्वजस्तंभावरील व्हील नादुरूस्त झाल्यामुळे ध्वज फडकविता आला नाही. त्यामुळे महापालिकेने बजाज कंपनीशी संपर्क साधून दुरूस्ती करण्याची सूचना दिली. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात दुरूस्ती काम होणे आवश्‍यक होते, पण झाले नाही. 22 मार्चपासून लॉकडाऊन लागू झाले, त्यामुळे पुन्हा दुरूस्ती काम रखडले. लॉक डाऊन शिथिल झाल्यावर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बजाज कंपनीच्या सहा तज्ञांचे पथक बेळगावात दाखल झाले. त्यानी 10 जून रोजी दुरूस्ती काम हाती घेतले. त्याचवेळी बेळगावात पावसाला सुरूवात झाली, त्यामुळे दुरूस्तीलाही विलंब लागला. आठवडाभरानंतर नेमकी समस्या समजली.

ध्वजस्तंभावरील व्हील नादुरूस्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते व्हील काढून नवे बसविण्यात आले. गेल्या आठवड्यात हे काम पूर्ण झाले, पण प्रात्यक्षीक घेता आले नव्हते. बुधवारी वातावरणाचा अंदाज घेवून सकाळी आठ वाजता ध्वज फडकविण्यात आला. बेळगावातील हा ध्वज मार्च 2018 मध्ये सर्वप्रथम फडकविण्यात आला. तो ध्वज नियमितपणे फडकत रहावा अशीच बेळगावरांची अपेक्षा होती. पण जोरदार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे ध्वजाचे वारंवार नुकसान होवू लागले. त्यावर उपाय म्हणून ध्वजाचा आकार कमी करण्यात आला, तरीही ही समस्या सुटली नाही. ध्वज वर्षातून तीनवेळा फडकविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्यदिनी तो फडकविला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT