tax will be recovered by corporation 
कोल्हापूर

एमआयडीसीतील मिळकत कर महामंडळ वसूल करणार 

अभिजित कुलकर्णी

नागाव : चालू आर्थिक वर्षापासून औद्योगिक वसाहतीमधील ग्रामपंचायत कर औद्योगिक विकास महामंडळ वसूल करणार असल्याच्या सूचना संबंधित औद्योगिक संघटनांच्या माध्यमातून उद्योजकांना दिल्या आहेत. 2020-2021 वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-हातकणंगले पंचतारांकित या औद्योगिक वसाहतीमधील औद्योगिक संघटनांना औद्योगिक विकास महामंडळाने याबाबत लेखी पत्र दिले आहे. 

जमा होणाऱ्या करापैकी पन्नास टक्के कर संबंधित ग्रामपंचायतींना औद्योगिक विकास महामंडळ देणार आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायती चालू वर्षाची देयके उद्योजकांना लागू करतात. त्यानंतर मार्चअखेरपर्यंत कर उद्योजकांकडून ग्रामपंचायतींना दिला जातो. यावेळी तसे होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीकडून ही देयके औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात येतील. त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाकडून ही देयके उद्योजकांना लागू करण्यात येणार आहेत. 31 मार्च 2020 पूर्वीची थकबाकी असल्यास ही थकबाकी संबंधित उद्योजकाने ग्रामपंचायतीकडेच भरावी अशी सूचनाही केली आहे. 

यामुळे औद्योगिक वसाहतीमधून ग्रामपंचायतींना एकूण कराच्या पन्नास टक्केच रक्कम महामंडळाकडून मिळणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट होणार आहे; पण यामुळे औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाल्यास वसाहतींचे अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. त्यामुळे कोणत्याही सुविधा न देता औद्योगिक क्षेत्रात कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींना या निर्णयामुळे चपराक बसली आहे. 

यांना बसणार फटका 
शासनाच्या निर्णयामुळे हातकणंगले तालुक्‍यातील पुलाची शिरोली, टोप, पट्टणकोडोली, हुपरी, यळगूड, तळंदगे, करवीर तालुक्‍यातील शिये, शिरगाव, नेर्ली, तामगाव, सांगवडेवाडी, हालसवडे, विकासवाडी व कागल तालुक्‍यातील कागल, कसबा सांगाव ही गावे प्रभावित होणार आहेत. 

देयके लवकरच 
सध्या कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर गावे लॉकडाऊनमध्ये असल्याने ग्रामपंचायत कराची देयके तयार नाहीत; पण शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करत लवकरच ही देयके औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात येतील. 

दृष्टिक्षेप 
- या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना चपराक 
- 2020-2021 वर्षापासून अंमलबजावणी 
- औद्योगिक संघटनांना लेखी पत्राद्वारे कळवले 
- मागील थकबाकी मात्र, ग्रामपंचायतीकडे भरावी लागणार 

कोल्हापूर 

कोल्हापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT