teacher attended school without testing corona 
कोल्हापूर

तपासणी न करताच शिक्षक झाले हजर आणि आले पॉझिटिव्ह 

निरंजन सुतार

आरग (जि. सांगली) - शासनाच्या निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करून सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. कोवीड चाचणी करून शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश आहेत. मात्र, ही चाचणी न करताच एक शिक्षक शाळेत हजर राहिल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय धक्कादायक बाब म्हणजे तपासनीनंतर तो शिक्षक कोरोना पाॅझीटीव्ह आला आहे. 

बेडग ( ता. मिरज ) येथील एका नामांकित माध्यमिक शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शाळा सुरू झाल्यानंतर एक शिक्षक सोमवारी हजर झाला. शाळा सुटल्यानंतर दुपारी चाचणी केली तर अहवाल पॉझिटिव्ह आला. 
विशेष म्हणजे पॉझिटिव्ह शिक्षकाने सोमवारी दिवसभर शाळेत हजेरी लावली होती. सोमवारी ४०० पैकी ७२ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची ऑक्सीमीटरने अक्सिजन तपासण्याचे काम पॉझिटिव्ह शिक्षकांने केले होते. येथील  विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या संपर्कात पॉझिटिव्ह शिक्षक आल्याने मंगळवार पासून शाळा पुन्हा 14 दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना स्वतः फोन लावून लक्षणे दिसल्यास कोवीड चाचणी करून घेण्यास सांगितले आहे. शाळा १४ दिवस बंद राहणार आहे. 

- उज्ज्वला ढेरे, मुख्याध्यापिका, बेडग 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ENG 5th Test: ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडच्या गोलंदाजांची काढली हवा; शतक झळकावले, असा पराक्रम केला जो जगात फक्त पाच जणांना जमला

Ram Shinde: कोल्हेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पाठबळ: विधान परिषदेचे सभापती राम शिंदे; जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार!

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींचा खटला ९२ वर्षीय न्यायाधीशांसमोर, अमेरिकेत जज निवृत्त का होत नाहीत? वयोमर्यादेची अटच नाही

Vaibhav Suryavanshi चा हूक शॉट अन् उत्तुंग षटकार; आफ्रिकन समालोचकाची रिअ‍ॅक्शन व्हायरल, असं तो काय म्हणाला? Video

Pimpri News : पिंपरीत एबी फॉर्मच गहाळ; निवडणूक अधिकारी दोषी

SCROLL FOR NEXT