teacher demand for financial situation deteriorated salaries of CHB professor stopped since the last academic year 
कोल्हापूर

तासिका तत्वावर प्राध्यापकांची नियुक्ती थांबणार? ; 'ही' आहे सीएचबी प्राध्यापकांची मागणी

मतीन शेख

कोल्हापूर :  कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. लॉकडाउन काळात पेमेंटही डाउन झाल्याने आर्थिक स्थिती बिघडली आहे. सध्या राज्यातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. विविध शैक्षणिक संस्थांत अध्यापनाचे काम करणाऱ्या सीएचबी प्राध्यापकांचे वेतन मागील शैक्षणिक वर्षापासून थांबले आहे. ते लवकर मिळावे व लॉकडाउनच्या काळातीलही मानधन मिळावे, अशी मागणी होत आहे. 


सेट-नेट उत्तीर्ण होत पीएचडीही मिळवत प्राध्यापक बनण्याचे स्वप्न पाहिलेल्या अनेकांना कायमस्वरूपी नोकरीपासून दूर राहावे लागले आहे. त्यांच्या पदरात पडली सीएचबीसारखी वेठबिगारी. शासन आणि संस्थाचालक या दोघांच्या चुकीच्या धोरणामुळे यांची ससेहोलपट सुरू आहे. कोरोना काळात ती अधिकच वाढली आहे. आठ-दहा वर्षे राबूनही कायम न झालेल्यांनी संसाराचा गाढा कसा ओढायचा, असा पोटाचा प्रश्‍न पुढे आला आहे, तर अनेक अविवाहित युवकांचे लग्न ठरत नसल्याचे वास्तव आहे. तुटपुंजे मानधनही सध्या बंद असल्याने व संस्थेने निर्णय होईपर्यंत कामावर न परतण्याचे पत्रच काढल्याने सीएचबीधारक अधिक अस्वस्थ आहेत. 


लॉकडाउनपूर्वी नॅक मूल्यांकनासाठी विविध कामांचे रेकॉर्ड अहवालांच्या फायलींच्या कामात गुंतून गेलेल्या सीएचबी प्राध्यापकांचा विचार या कठीण काळात संस्थाचालक करत नसल्याचे दिसते. थकलेला पगार मिळत नाही आणि दुसरे शैक्षणिक वर्षांचे काय होणार? असा दुहेरी प्रश्‍न पुढे आहे. 


तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती थांबणार?
आजवर तासिका तत्त्वावर, अभ्यागत किंवा कंत्राट पद्धतीने करण्यात येणारी प्राध्यापकांची नियुक्ती बंद करण्यात येईल, असा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात उल्लेख असल्याने सीएचबी प्राध्यापकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

मुदतवाढ देण्याची मागणी
शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला, परंतु सीएचबीधारकांना मात्र वेतनापासून वंचित ठेवत पुढील निर्णयापर्यंत  ‘जैसे थे’ थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीएचबीधारकांनाही मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सीएचबी प्राध्यापकांना तुटपुंजे मानधन मिळते. ते वेळेवर मिळत नाही. लॉकडाउनच्या काळात कामावर न येण्याच्या सूचना केल्या आहेत. संस्थेने संचित निधीतून या कठीण काळात मानधन द्यावे. 
- प्रा. दत्ता जाधव.

दहा वर्षांपासून तासिका तत्त्वावर अध्यापन करत आहे. मिळत असलेल्या मानधनावर उदरनिर्वाह करणे कठीण जाते. या महामारीच्या काळात मानधन व काम थांबले आहे. शासन, संस्थेने पुढील नेमणुकीसाठी लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. 
- प्रा. करीम मुल्ला.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT