कोल्हापूर

कौतुकच! चार महिन्यांच्या बाळाला मिळाला मायेचा हात अन्

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: चार महिन्यापूर्वीच पतीचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेने (ZP Teacher) कोरोनाग्रस्त आईच्या (Covid 19 infected)चार महिन्यांच्या बाळाचा पंधरा दिवस सांभाळ करून सामाजिक बांधिलकी जपली. भारती नानचे (Bharti nanache) असे या शिक्षिकेचे नांव असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Teacher-support-to-the-baby-of-covid-infected-mother-kolhapur-news)

संबंधित बाळाच्या आईला, आजीला व आजोबांना करोनाची लागण होऊन ॲडमिट व्हावे लागले; पण चार महिन्यांच्या बाळाला सांभाळायला कोणी नाही. अशा स्थितीत त्याला सोबत ठेवणेही धोकादायक. या कुटुंबाची व्यथा समजल्यानंतर श्रीमती नानचे यांनी पुढाकार घेऊन या मुलाचा सांभाळ केला. श्रीमती नानचे जिल्हा परिषदेच्या वाशी (ता. करवीर) शाळेत शिक्षिका आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी श्रीमती नानचे यांची बहीण, बहिणीची सून, सुनेचे आई-वडील, चुलते कोरोना पॉझिटिव्ह आले. बाळाची अँटिजेन टेस्ट मात्र निगेटिव्ह आली होती. सर्व ॲडमिट असल्याने चार महिन्यांचे बाळ कोणाकडे ठेवायचे हा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळाच्या आजीची बहीण म्हणजे श्रीमती नानचे ह्या बाळाला ठेवून घ्यायला कोरोनाचा धोका असतानाही तयार झाल्या. गेले पंधरा दिवस त्या बाळाला खाऊ-पिऊ देणे, झोपेची व तब्येतीची काळजी घेणे हे सर्व स्वतः च्या बाळासारखे करत आहेत.

पतीच्या आकस्मिक निधनाचे दु:ख बाळात विसरून गेल्याचे श्रीमती नानचे सांगतात. दिवस-रात्र बाळाबरोबर जाते. बाळाला आईची आठवण येऊ देत नाहीत इतका लळा नानचे यांनी संबंधित बाळाला लावला आहे. कोरोना काळात एकीकडे माणुसकीला काळीमा फासला जात असल्याची अनेक उदाहरणे समोर येत असताना श्रीमती नानचे यांनी मात्र अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे आपल्या कृत्तीतून दाखवून दिले.

नात्यातीलच बाळ असल्याने धाडस करून त्याला घरी आणले. त्याला माझा एवढा लळा लागला की काल (ता. २३) बाळाचे नातेवाईक नेण्यासाठी आल्यानंतर त्यांच्याकडे ते जायलाही तयार होईना. कोरोनामुळे ही परिस्थिती आणली आणि एक चांगले काम करण्याची संधी मिळाली.

श्रीमती भारती नानचे, शिक्षिका,वाशी, ता. करवीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: खासगी विमान कंपन्यांबाबत सरकारचं मोठं पाऊल; बारामती विमान अपघातानंतर घेतला निर्णय

एम. एम. बेग बापरे! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा घरात सापडला मृतदेह, दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांना आला संशय

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाची मोजणी सुरू, पोलिसांकडून शेतकऱ्यांना अटक; राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढवणार, राजू शेट्टींचा इशारा

Uttar Pradesh Order: साहेबांचा फोन उचलला नाही तर खैर नाही! योगी सरकारचा मोठा निर्णय; १० मिनिटांत कॉल बॅक न केल्यास वाजणार धोक्याची घंटा

Gold Rate Today: कालच्या मोठ्या वाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त! एक तोळा सोन्यासाठी आता किती पैसे लागणार? पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT