Teachers Demand Release From Work At Checkposts Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चेकपोस्टवरील ड्युटीने वैतागले शिक्षक, कामातून मुक्त करण्याची केली मागणी 

अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून गडहिंग्लज तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षक विविध चेकपोस्टवर काम करीत आहेत. याबरोबरच शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षण, पालक संपर्कासह विविध कामे सुरू आहेत. दुहेरी कामे करताना शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना चेकपोस्टवरील कामातून मुक्त करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने केली आहे. तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले आहे. 

22 मार्चपासून प्राथमिक शिक्षकांना चेकपोस्टवर ड्युटी दिली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या काही शिक्षकांना गंभीर आजार आहे, तर काही शिक्षक वयस्क आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. शिवाय चेकपोस्टवर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत.

पाणी, शौचालय, पीपीई किट, सॅनिटायझरशिवाय शिक्षक आरोग्य धोक्‍यात घालून आणि मानसिक तणावाखाली काम करीत आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षण, पालक संपर्क, विद्यार्थ्यांना घरी जाऊन अभ्यास देणे, कार्यालयाकडून मागविली जाणारी विविध माहिती देणे या कामाचीही जबाबदारी पार पाडत आहेत. या दुहेरी कामात शिक्षकांची कसरत होत आहे. त्यामुळे शिक्षकांना चेकपोस्टवरील कामातून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

तहसीलदार दिनेश पारगे यांनी निवेदन स्वीकारले. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, समन्वय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वाईंगडे, सरचिटणीस गणपती पाथरवट, सतीश तेली, मधुकर येसणे, सुभाष निकम, संजय चाळक, आण्णासाहेब शिरगावे, राजेंद्र मांडेकर, भीमराव तराळ, अनिल बागडी, मधुकर जरळी यांनी हे निवेदन दिले. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT