The temples in Shirol taluka are still deserted 
कोल्हापूर

शिरोळ तालुक्‍यातील मंदिरे अद्याप सुनीसुनी

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर : लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर शिरोळ तालुक्‍यातील मंदिरे बंद असल्याने पुणे, मुंबईच्या भाविकांना दर्शनासाठी आता दिवाळीच्या सुटीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. भाविकांचा सर्वाधिक ओढा असणाऱ्या नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरासह खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर भाविकांविना सुनेसुने वाटत आहे. धार्मिक आणि पर्यटनाचे रस्ते बंद झाल्याने यावर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांनाही याची झळ बसली आहे. 

नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात सध्या पहाटेची पूजा, अकरा वाजता पंचामृत अभिषेक, साडेबारा वाजता महापूजा, तीन वाजता पवनाम पठण, साडेसात वाजता आरती आणि साडेआठ वाजता "श्रीं'ची पालखी असे नित्य धार्मिक कार्यक्रम मोजक्‍या सेवेकऱ्यांमार्फत सुरु आहेत. लॉकडाउनमध्ये नित्य पूजेत खंड पडला नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत येथे दर्शनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागांतून भाविकांची मांदियाळी असते. यावर मिठाई, रसवंती, हॉटेल, प्रवासी वाहतूक, निवासी व्यवस्था, नौकाविहार, खेळण्यांची दुकाने, आईस्क्रीम पार्लर, फोटो व्यावसायिकांसह विविध दुकानदारांचा उदरनिर्वाह चालतो. उन्हाळी आणि दिवाळीचे दोन हंगाम यांच्यासाठी महत्त्वाचे असतात. 

यावर्षी मात्र भाविकांविना मंदिर आणि परिसरात शांतता आहे. इतरवेळीही गल्लीबोळात गर्दीची स्थितीदेखील दिसत नाही. खिद्रापूरच्या कोपेश्‍वर मंदिराची अवस्थाही याहून वेगळी नाही. कृष्णा नदीवरील हे पुरातन वास्तूशिल्प पाहण्यासाठी नृसिंहवाडीनंतर याला पसंती दिली जाते. कोपेश्‍वर मंदिरामुळे खिद्रापूरची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. केळी उत्पादनासाठी "मिनी जळगाव' अशीही गावची ओळख आहे. येथे निवासाची विशेष व्यवस्था नसल्याने मंदिर पाहून भाविक परतीच्या प्रवासाला लागतात. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतके व्यावसायिक येथे असतात. त्यांच्याही उदरनिर्वाहाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
 

ग्रामदैवतेही कुलूपबंद... 
शिरोळ तालुक्‍यातील गावागावांतील ग्रामदैवतांची मंदिरेही अद्याप कुलूपबंद आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात विशेष दक्षता घेतली जात असल्याने बंद मंदिराची भाविकांनी अडचण वाटत नाही. 

दृष्टिक्षेप 
- नृसिंहवाडी, कोपेश्‍वर मंदिरे सुनेसुने 
- मोजक्‍या सेवेकऱ्यांमार्फत पूजा-अर्चा सुरू 
- पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना झळ 
- पुढील चार महिनेही उत्पन्नाचे साधन नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न 

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT