Tender rejected of Ajra Sugar Factory
Tender rejected of Ajra Sugar Factory  
कोल्हापूर

आजरा साखर कारखान्यासाठी आलेले एकमेव टेंडरही नामंजूर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी केडीसीसी बँकेने काढलेले टेंडर आज नामंजूर करण्यात आले. बॅंकेचे ज्येष्ठ संचालक पी.जी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, थकीत कर्जापोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतला आहे. तो भाडे तत्त्वावर चालविण्यासाठीचे टेंडर बँकेने काढले होते. या टेंडरला प्रतिसाद देत केवळ एका पार्टीने निविदा दाखल केली. पुण्यातील विजन इंडिया सेवन ट्रेडर्स कंपनीच्यावतीने यशवंत दत्तात्रय देसाई यांनी टेडर फॉर्म भरलेला होता. मात्र या टेंडरसोबत बयाना रकमेपोटी दिलेला डीडी वटला नाही. तसेच या टेंडरधारकांची आर्थिक सक्षमता बँकेच्या पॅनेलवरील चार्टर्ड अकाउंटंट यांनी तपासली असता, ती फार्म आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या फर्मचे टेंडर नामंजूर करण्यात आले. त्यामुळे या कारखान्याबाबतचे पुढील कार्यवाहीचे धोरण बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व कारखाना संचालक मंडळांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्याचेही या बैठकीत ठरले.

 बँकेचे ज्येष्ठ संचालक पी. जी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, असिफ फरास,  विलासराव गाताडे, अनिल पाटील, सर्जेराव पाटील- पेरीडकर, आर.के. पवार, उदरयानीदेवी साळुंखे, चार्टड अकाऊंट सुनील नागावकर व चार्टर्ड अकाऊंट महेश गुरव, सहकार जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने आदी उपस्थित.


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT