The term of Kolhapur Municipal Corporation members has come to an end, but there is no preliminary preparation for the elections 
कोल्हापूर

कोल्हापूर महापालिका सदस्यांची मुदत संपत आली, मात्र निवडणुकीची प्राथमिक तयारीही नाही

डॅनिअल काळे

कोल्हापूर ः महापालिकेस राज्य निवडणूक आयोगाने पत्र पाठवून प्राथमिक प्रक्रिया सुरु करा, असा आदेश महापालिकेला दिला होता. विद्यमान सभागृहाची मुदत सपांयला दोन महिन्याचा कालावधी उरला असला तरी एक तसूभर ही निवडणूक प्रक्रिया पुढे गेली नसल्याने ही निवडणूक जवळपास तीन महिने लांबणीवर पडेल, अशी शक्‍यता आहे. मतदारसंख्या निश्‍चित करणे, मतदार याद्या तयार करणे आणि प्रभाग रचना तयार करणे, या तिन्ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने आता मुदतीत महापालिका निवडणूका होणे अशक्‍य आहे. 

कोल्हापूर महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपणार आहे. तत्पुर्वी नवी सभागृह अस्तित्वात यावे लागते. पण कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरातील त्याची तिव्रता अद्यापही जास्त असल्यामुळे याच कामात महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यरत आहे. विद्यमान सभागृहाची मुदतही 15 नोव्हेंबरला संपेल आणि 31 ऑक्‍टोंबर पुर्वी शेवटची सर्वसाधारण सभा होईल. त्यानंतर सभा होऊ शकणार नाही. महापालिकेची निवडणूक मुदतीपुर्वी व्हायची असेल तर ऑगस्टपुर्वी सर्व प्रक्रिया पुर्ण होणे आवश्‍यक होते. विशेष म्हणजे मतदार याद्या तयार करणे, प्रभाग निश्‍चिती करणे आणि आरक्षणे टाकणे ही यातील महत्वाची प्रक्रिया आहे. यापैकी मतदारसंख्या निश्‍चित करणे आणि प्रभाग रचना करणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. ऑक्‍टोंबर पुर्वी निवडणूक व्हायची असेल तर ही प्रक्रिया दरवेळी जून, जुलैमध्येच होते. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सर्वच कामावर मर्यादा आल्या आहेत. सर्व महापालिका तसेच शासकीय यंत्रणाही कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने ही सर्व कामे ठप्प आहेत. 
मध्यंतरी राज्य निवडणूक आयोगाने कांही प्रक्रिया सुरु करा, असे पत्र पाठविले होते. पण अतिशय संतगतीने काम झाले आणि यापैकी एक अक्षर पुढे ही प्रक्रिया गेली नाही. त्यामुळे आता महापलिकेची निवडणूक पुढे जाणार हे स्पष्ट आहे.

तर प्रशासक येणार 
महापालिकेची मुदतीत निवडणूक झाली नाही तर तीन महिने प्रशासकीय कामकाज चालेल. यामुदतीत निवडणूकीची सर्व प्रक्रिया होऊन ही निवडणूक जानेवारी अथवा फेब्रुवारी 2021 मध्येच होण्याची आता शक्‍यता आहे.याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा आदेश आला नसला तरीदेखील सद्यस्थितीत निवडणुकीविषयी कोणतेच काम सुरु नसल्याने महापालिकेची ही निवडणूक लांबणीवर पडणार हेच आता स्पष्ट झाले आहे. 

कोल्हापूर शहराची लोकसंख्या : 5 लाख 48 हजार 
शहरातील प्रभागांची संख्या : 81

--

संपादन यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT