terty thousand employees in Kolhapur district for Corona liberation 
कोल्हापूर

कोरोना मुक्तीसाठी कोल्हापुर जिल्ह्यात राबतेय 13 हजार कर्मचाऱ्यांची फौज...

सदानंद पाटील

कोल्हापूर - संपूर्ण जगभर, देशात आणि राज्यात कोरोेनाचा हाहाकार माजला आहे. त्यामुळेच गड्या आपला गाव बरा, असे म्हणत अनेक लोकांनी गावाकडे धूम ठोकली आहे. मागील आठ ते दहा दिवसात जिल्ह्याबाहेरील 50 हजार पेक्षा अधिक लोकांनी प्रवेश केला आहे. ही संख्या अजूनही वाढत आहे. या सर्व लोकांना शोधून त्यांचे आरोग्य तपासणी करणे आणि जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी तब्बल 13 हजार कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोना ने थैमान घातले आहे. कोरोनाचे देशात 580 रुग्ण झाले असतानाच अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भीतीचे सावट वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. परदेशातून येणारी सर्व विमाने रद्द केली आहेत. रेल्वेसेवा, बससेवाही बंद केली आहे. खाजगी वाहनांना ही प्रवेशबंदी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही विविध प्रकारची दक्षता घेतली जात आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्व गावांच्या सीमा बंद करण्यात आले आहेत. तसेच मागील आठ- दहा दिवसापासून जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्या बाहेरून तसेच विदेशातून कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 50 हजार लोक आले आहेत. तसेच अजूनही अनेक लोकांची नोंद घेणे बाकी आहे. जोपर्यंत या सर्व लोकांची नोंद होत नाही व आरोग्य तपासणी होत नाही तोपर्यंत कोरोनाचा नेमका किती धोका आहे ते समजणार नाही.

बाहेरून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे विविध पथके कार्यरत आहेत. बाहेर देशातून आलेल्या तसेच मुंबई, पुणे इथून आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कडूनच केली जात आहे. आरोग्य विभागाचे 1500 कर्मचारी तसेच 3000 आशा वर्कर, 8 हजार अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी सुरू आहे.

आरोग्य विभागाकडे सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. मोठ्या प्रमाणात जे बाहेरून प्रवासी येत आहेत त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरांटाईन साठीही काही कक्ष जिल्हाभरात राखीव ठेवण्यात आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष व आरोग्य सभापती आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात विभाग कार्यरत आहे.

- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT