The first cosmic sant sahitya sammelan on extension sakal
कोल्हापूर

पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन लांबणीवर

ओमिक्रॉनच्या लाटेनंतर पुन्हा कोल्हापुरातच नियोजन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर येथे नियोजित पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या (Sant Sahitya Sammelan) तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच नवीन तारखा जाहीर केल्या जाणार असून येथील महासैनिक दरबार हॉलमध्येच संमेलनाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ किर्तनकार मदन महाराज गोसावी, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा.डॉ. प्रकाश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, चौदा ते सोळा जानेवारीदरम्यान हे संमेलन नियोजित होते.

विश्वबंधुत्वाची शिकवण संत परंपरेने दिली आणि कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने प्रत्येकाला ती अनुभवायला मिळाली. संमेलनाच्या निमित्ताने जगभरातील संत साहित्यावर मंथन होणार आहे. मारूती महाराज कुरेकर यांना निष्ठावंत वारकरी जीवनगौरव तर हरिव्दार येथील महंत ऋषीश्वरानंदजी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. सतरा देशांचे राजदूत पूर्णवेळ संमेलनात ऑनलाईन सहभागी होणार आहेत.

संत साहित्य आणि पर्यावरण, संत साहित्य आणि लोकत्व, अस्वस्थ वर्तमानात संत विचारांची भूमिका आदी विषयावर परिसंवाद होतील. भक्तिसंप्रदाय आणि विश्वात्मकता या परिसंवादात विविध पंथ, संप्रदायांवर विचारमंथन होणार आहे. त्यातील वक्त्यांबरोबरच देशभरातील विविध भक्तीसंगीताचे कार्यक्रमही निश्चित झाले आहेत. नियोजित संमेलन पुढे होणार असले तरी संमेलनातील एकूणच कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित झाली असून त्यानुसारच पुढील संमेलन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Latest Marathi News Updates : हिमाचल आपत्तीवर भाजप खासदार कंगना राणौत यांचे विधान

Nashik News : नाशिकच्या कालिका मंदिरात नवरात्रोत्सवाचा जयघोष: भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा

Pune News : बालगंधर्वच्या आवारात हॉटेलचे पार्किंग; हॉटेल व्यावसायिकाने ठेकेदाराला केले मॅनेज

SCROLL FOR NEXT