sangli sakal
कोल्हापूर

Sangli News : खासदार धैर्यशील मानेंसमोर ‘ती’ने पुस्तक वाचले धडाधडा

तळीच्या वाड्यावर लोकप्रतिनिधींनी अनुभवली प्रज्ञा

सकाळ डिजिटल टीम

शिराळा : चांदोली अभयारण्यालागतचे गाव. सायंकाळची वेळ. दिवस मावळतीला गेलेला. अंधार पडू लागल्याने दिवसा उजेडी घराकडे परतण्याची घाई करणारे शेतमजूर, महिला व पुरुष. रानात गेलेली जनावरे परतीला लागलेली. दोनच दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तळीच्या वाड्यावर मुलगी ठार झाल्याची घटना घडल्याने सुखरूप घरी पोहोचण्याची भीती, असे एकंदर वातावरण.

खासदारांच्या गाड्यांचा ताफा एका घरासमोर थांबला. त्यावेळी एक चिमुकली कुतुहलाने घरातून अंगणात डोकावली. खासदार धैर्यशील माने यांची नजर ‘त्या’ मुलीकडे गेली. ते खाली उतरून घराच्या ओसरीवर बसले. त्यांनी मुलीला घरातून पुस्तक घेऊन यायला सांगितले. चिमुकली बालभारतीचे पुस्तक घेऊन आली. माने यांनी वाचायला सांगितले.

मुलीने न घाबरता खासदारांसमोर धडाधडा वाचून डोंगरदऱ्यातही शैक्षणिक गुणवत्तेची खाण असल्याचे दाखवून दिले. तिच्या धाडसाचे खासदार माने यांनी कौतुक केले.हा प्रसंग आहे, शाहूवाडी तालुक्यातील शित्तूरपैकी ढवळेवाडीचा. तळीचा वाडा येथील सारिका गावडे ही मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली.

कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी खासदार माने त्या वाड्यावर गेले होते. तेथे भेटून परतीच्या मार्गावर असताना वाटेत ढवळेवाडी येथेही स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थांबले होते. त्यांनी कार्यकर्त्यांऐवजी मुलांची शाळा घेतली. त्यांच्यासमोर प्रतीक्षा सावंत हिने पुस्तक कसे धडाधडा वाचले, हे सांगितले. डोंगरदऱ्यातील पालक अल्पशिक्षित असल्याने भविष्याचा विचार कोठून येणार? खासदारांसमोर धाडसाने केलेल्या वाचनाचे कौतुक करायला खासदार विसरले नाहीत.

पाच वर्ग, एक शिक्षक

ढवळेवाडी येथील शाळा द्विशिक्षकी असताना गेली पाच वर्षे पहिली ते पाचवी असा १३ पट आहे. पाच वर्गावर एकच शिक्षक आहेत. त्यामुळे मुलांच्या गुणवत्तावाढीला खीळ बसत आहे. शाळांच्या गुणवत्तावाढसाठी शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MIDC Closed: विदर्भातील १ हजार २४६ उद्योग पडले बंद; उच्च न्यायालयातर्फे गंभीर दखल; उद्योगक्षेत्राची दयनीय स्थिती

Electricity Workers Strike:'राज्यातील ४२ हजार वीज कर्मचारी तीन दिवस संपावर'; सातारा जिल्ह्यातील कामगार सहभागी हाेणार, विविध प्रश्न प्रलंबित

तुळशीबाग अन् दिवाळी खरेदी... कपड्यांपासून ते स्वयंपाकघरातील वस्तूंपर्यंत सर्व काही एका ठिकाणी; पण ‘ही’ काळजी नक्की घ्या!

पुण्यात ७० गँग कार्यरत... घायवळला सरकारचं पाठबळ; अनिल परबांनी थेट शस्त्र परवान्याची प्रोसेसच सांगितली, योगेश कदम अडचणीत!

Video : काव्याला वाचवताना पार्थचा जीव जाणार ? प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले की "आता ती मानिनी..."

SCROLL FOR NEXT