sakal
कोल्हापूर

महिलेने धाडस दाखविल्याने चोरट्यांनी काढला पळ

हदनाळमध्ये दुचाकीस्वाराकडून दागिने चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न!

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : शेतातील काम आटोपून घराकडे येत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण या महिलेने धाडस दाखवून प्रतिकार करताच चोरट्यांनी पळ काढला. ही घटना म्हाकवे-हदनाळ रस्त्यावर शुक्रवारी (ता. २७) घडली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, हदनाळ येथील शालन साताप्पा पंडे (वय ६५) या शेताकडे गेल्या होत्या. शेतातील काम आटोपून दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान त्या म्हसोबा मंदिराजवळ आल्य असता तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीस्वाराने या महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर हिसडा मारला. परंतु या महिलेने न घाबरता प्रतिकार करत धैर्याने चोरट्याचा हात पकडून धरला. त्यामुळे या महिलेचे दागिने सुरक्षित राहिले.

चोरट्यांनी महिलेच्या धाडसामुळे तेथून पळ काढला. आणि हे दोघे चोरटे शेंडूर रस्त्याने सुसाट वेगाने निघून गेले. चोरट्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे हदनाळ परिसरातील महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतामध्ये एकटी कसे जायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT