Their world is flourishing with the ashes of the world 
कोल्हापूर

संसाराची राखरांगोळी करून फुलतोय त्यांचा संसार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः लॉकडाऊनमुळे एकीकडे काम नाही, कामगार, नोकरदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, दुसरीकडे लोकांना जुगाराचे व्यसन लावून त्यांना कंगाल करण्यासाठी मटका मालकांनी धंदा जोमात सुरू केला. अलिखित आदेशानुसार शहरात, इचलकरंजी, राधानगरी अशा सर्वच ठिकाणी अड्डे खुले झाले आहेत. या धंद्यात रोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. लॉकडाऊन, संचारबंदी ही केवळ सर्वसामान्यांना वेठीस धरण्यासाठी आणि अवैध धंदेवाल्यांना सारेकाही ओपन अशी स्थिती पाहावयास मिळत आहे.

मटक्‍यांची पाळेमुळे उखडण्यासाठी पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी मुजोर मटका मालकांनी लोकांना लुबाडण्यासाठी अड्डे सुरू केले. आज एका सामाजिक कार्यक्रर्त्यांनी याबाबत थेट चिठ्ठ्या देऊन पोलिसांकडे तक्रार केली. हे एक निमित्त आहे, वास्तविक एकीकडे कडक नियमावली केली जात असताना दुसरीकडे मटक्‍यांच्या आकड्यांचा खेळ मांडला जात आहे. इचलकरंजी येथे मटकाकिंगवर मोकाखाली कारवाई झाल्यानंतर मटका बंद होईल अशी पुष्टी दिली जात होती; परंतू आता वडिलांचा वारसा घेऊन मुलगा धंद्यात आला आहे. दरररोजची उलाढाल 9 लाखांची असल्याचे काही जण सांगत आहेत.

दररोज लाखोंची उलाढाल 
इचलकरंजीतून राधानगरी मटक्‍याचे कनेक्‍शन झाले असून तिथे ही अशाच पद्धतीने मटक्‍यांचा अड्डा मांडला जात आहे. तिथे ही 15 ते 20 लाखांची उलाढाल असल्याचे सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT