There Is No Corona Care Center For Patients In Shirol Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शिरोळमधील रुग्णांसाठी एकही कोरोना केअर सेंटर नाही

गणेश शिंदे

जयसिंगपूर : कोरोनाशी लढा देण्यास शासनाने नियमावली जाहीर करून त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, कोरोना रुग्णांसाठी शिरोळ तालुक्‍यात एकही शासकीय कोरोना केअर सेंटर सुरू केले नसल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा रुग्णांच्या जीवावर आणि खिशावरही बेतणारा ठरत आहे. खासगी रुग्णालयांमधील उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरचा असल्याने प्रशासनाने तातडीने शिरोळ तालुक्‍यात ठिकठिकाणी कोरोना उपचार केंद्रे सुरू करून गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्याची गरज आहे. 

शिरोळ तालुक्‍यात कोरोना रुग्णांच्या प्रमाणात पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पहिल्या टप्प्यात प्रशासनाने कोरोनाशी लढण्याची जय्यत तयारी केली. लोकांनाही कोरोनाचे गांभीर्य होते. पहिल्या टप्प्यापेक्षाही दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाची तीव्रता अधिक असल्याने शासनाने त्यादृष्टीने नियमावली तयार करून गर्दीच्या ठिकाणांवर विशेष दक्षता बाळगण्याची भूमिका घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र, लोकसहभागाअभावी या नियमांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचेही चित्र आहे. 

गर्दीवर कारवाई होत नसल्याने बिनधास्तपणे लोकांचा वावर सुरू आहे. पाचपेक्षा अधिक लोक जमल्यास कारवाईचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात जागृतीशिवाय कारवाई होताना दिसत नाही. थुंकल्यास हजार रुपये दंडाची तरतूद असली तर थुंकणाऱ्या पिचकारी बहाद्दरांवर लक्ष ठेवणार कोण असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई मंदावल्याने हा नियमही पायदळी तुडवला जात असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. शासनाची नियमावली कठोरपणे राबविण्याची गरज असताना केवळ प्रबोधनापलीकडे यंत्रणा जायला तयार नसल्यानेच कोरोनाचा अधिक धोका वाढला आहे. 

तालुक्‍यात एकही शासकीय कोरोना केअर सेंटर नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत असताना खासगी रुग्णालयांच्या बिलावरून वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तालुक्‍यात ठिकठिकाणी उपचार केंद्रे सुरू करण्याची मागणी होत आहे. 

दृष्टिक्षेपात कोरोना शिरोळ तालुका
- एकूण रुग्ण-4156 
- मृत रुग्णांची संख्या-183 
- जयसिंगपूरमधील रुग्ण संख्या-861 
- मृतांची संख्या-43 

हेच मोठे दुर्दैव 
शिरोळ, दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी मात्र इचलकरंजीच्या आयजीएम किंवा कोल्हापूरच्या सीपीआरकडे धाव घ्यावी लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या बिलाचा भार सोसवणारा नसल्याने सध्या रुग्णांची तिकडे धाव आहे. पण तालुक्‍यात शासकीय कोरोना केअर सेंटरची गरज प्रशासनाला कळत नाही हेच मोठे दुर्दैव आहे. 

केअर सेंटरची गरज
शिरोळ तालुक्‍यात कोरोना केअर सेंटरची गरज आहे. चार दिवसांत याबाबतच्या सकारात्मक हालचाली होतील. यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. 
- डॉ. पी. एस. दातार, शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT