There Is No Road At The Three Dhangarwadas In Ajara Kolhapur Marathi News
There Is No Road At The Three Dhangarwadas In Ajara Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजऱ्यातील तीन धनगरवाड्यांवर रस्ताच नाही

रणजित कालेकर

आजरा : तालुक्‍यात सात धनगरवाडे आहेत. या पैकी हरपवडे, किटवडे, आवंडी धनगरवाडा क्रमांक 3 या तीन धनगरवाड्यांवर रस्ताच नाही. चार धनगरवाड्यावर रस्ता आहे पण त्याचीही दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या चार धनगरवाड्यावर "रस्ता असून खोळंबा नसून अडचण' अशी स्थिती आहे. अनेकदा वाहने धनगरवाड्यावर पोहचत नसल्याने रुग्णांना व गरोदर मातांना घोंगड्याची झोळी किंवा पाळणा करून आजऱ्याला उपचारासाठी न्यावे लागते. रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात ग्रामस्थांचे मोठे हाल होतात. त्यावेळी रुग्ण व गरोदर मातांना देवावरच हवाला ठेवावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. वर्षानुवर्ष हेच चित्र आहे. 

तालुक्‍यातील सर्वच धनगरवाडे दुर्गम डोंगर दऱ्यात आहेत. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई हरपवडे धनगरवाड्यावर भेट दिली होती. अडीच किलोमीटरची चढण व तेवढीच उतरण करत पायपीट त्यांना करावी लागली. धनगरवाड्यावरील ग्रामस्थांचे हाल व समस्या पाहून येथे माणसं कशी राहतात, असे आश्‍चर्ययुक्त उद्‌गार त्यांनी काढले होते. ते स्वतः गलबलून गेले. 

या धनगरवाड्यावर आरोग्याची सेवा आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरवणे हे जिकिरीचेच आहे. पावसाळ्यात ओढे-नाले ओलांडून धनगरवाड्यावर आरोग्य सेवा पुरवावी लागते. त्यामुळे तिकडे फिरकण्यास कोणी उत्सुक नसतो. वेळेत उपचार मिळाले नसल्याने ग्रामस्थांना जीव गमवावा लागला आहे. आवंडी धनगरवाडा क्रमांक 1 व 2 वर रस्ता पोहचला आहे, पण तो खड्डीचा आहे. पक्का रस्त्याचा प्रस्ताव अडीच किलोमीटरचा मंजूर आहे. तेथून पुढील आवंडी क्रमांक 3 च्या वाड्यावर दीड किलोमीटरचा रस्ता झालेला नाही.

मोरेवाडी धनगरवाड्यावर रस्ता झाला आहे, पण तो कच्चा आहे. किटवडे, हरपवडे धनगरवाड्यावर रस्ते झालेले नाहीत. येथील रस्ते वनविभागाच्या लाल फितीत अडकले आहेत. आमदार प्रकाश आबिटकरांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, पण वनविभागाच्या जाचक कायद्यामुळे रस्ते या धनगरवाड्यावर पोहोचलेच नाहीत.

चितळे येथील भावेवाडी धनगरवाडा हा आजरा चंदगड रस्त्यावर आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची दळवळणाची चांगली सोय झाली आहे. पण अन्य धनगरवाड्यावर मात्र रस्त्यांच्या अडचणीमुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, ग्रामस्थांना तालुक्‍यातील विविध कामासांठी जाण्याकरीता पायपीटच करावी लागते. हत्ती, गवे व जंगली श्‍वापदाचा वावर परिसरात असल्याने प्रसंगी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात अनेकदा वाटा बंद होतात. 

आजरा तालुक्‍यातील प्रमुख धनगरवाडे 
आवंडी क्रमांक 1, 2 व 3. चितळे पैकी भावेवाडी, मोरेवाडी, हरपवडे, किटवडे या पैकी आवंडीच्या तीन धनगरवाड्यांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. उर्वरित सर्व धनगरवाडे अन्य ग्रामपंचायतीशी जोडले आहेत. 

हरपवडे धनगरवाड्याचे स्थलांतर 
हरपवडे धनगरवाड्यावर 15 कुटुंबे राहतात. रस्ते, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा नसल्याने हा धनगरवाडा पेरणोलीच्या हद्दीत हलवण्यासाठी महसूल विभागाकडून हालचाली सुरू आहेत. या कुटुंबाना पेरणोली गावच्या गायरान जमीन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT