There Will Be A Dispute In The Meeting Of Ichalkaranji Municipality Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजी पालिकेची सभा वादळी ठरणार 

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : येथील पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.11) दुपारी 12.15 वाजता आयोजीत करण्यात आली आहे. सभेसमोर तब्बल 82 विषय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये जागा आरक्षण रद्द करण्यासह अनेक महत्वाचे विषयांचा समावेश आहेत. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची चिन्हे अधिक आहेत. 

मुळात विषय पत्रिकेसोबत प्रथमच प्रशासनाकडून टिप्पणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सभा होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरली आहे. भुयारी गटार योजनेच्या मक्तेदारास मुदतवाढ देण्याचा वादग्रस्त विषय सभागृहासमोर आहे. या विषयावरील निर्णय घेतांना सभागृहासह प्रशासनाची कसोटी लागणार आहे. विरोधकांनी या विषयावरुन सत्तारुढ गटासह प्रशासनाला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली आहे. 

जागा आरक्षण रद्द करण्याचे विषय पून्हा चर्चेला आणले आहेत. गेल्या सभेत हे विषय प्रलंबीत ठेवण्यात आले आहेत. या विषया संदर्भात ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, कॉंग्रेसचे सुनिल पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रतोद अशोक जांभळे यांनी संबंधित सर्व विषय रद्द करण्याची अथवा फेरबदलासह नियोजन समितीकडून पून्हा सभागृहासमोर आणण्याची मागणी केली आहे. या शिवाय दुकान गाळेधारकांनी 30 वर्षे मुदतीने गाळे भाड्यांने देण्याचा विषय प्रलंबित आहे. या विषयावर कोणता निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. 

पूर रेषेतील नागरिकांचा विषय मंजुरीसाठी 
महापूराच्या पार्श्‍वभूमीवर पूर रेषेतील नागरिकांना सहाय्यभूत करणारी प्रणाली विकसित करण्याचा विषय मंजुरीसाठी सभागृहासमोर आहे. तर शहरात वैशिष्ट्‌यपूर्ण योजनेतून शुध्द प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये करण्यात आलेला बदल सभागृहाच्या निदर्शनास आणण्याचा विषय आहे. यासह आणखी काही विषयावर सभा वादळी होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - सचिन चराटी

Kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane चा अजित आगरकरच्या निवड समितीवर निशाणा; स्पष्ट शब्दात सांगितलं ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला माझी गरज होती पण...

Saswad Heavy Rain: सासवड जेजुरी पालखी मार्ग जलमय; खळद, शिवरी येथे अर्धा तास मुसळधार पाऊस

IND vs SA Test Series: तो परत आला...! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; ३ फिरकीपटूंचा समावेश

Bacchu Kadu: जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला: बच्चू कडू; शेतकऱ्यांचा ‘आसूड मेळावा’; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

Latest Marathi News Live Update :निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी बबलू सुरवसेला सांगलीतून अटक

SCROLL FOR NEXT