These veterans are aspiring for the post of Vice Chancellor of Shivaji University
These veterans are aspiring for the post of Vice Chancellor of Shivaji University 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगूरूपदासाठी हे दिग्गज आहेत इच्छु!

प्रतिनिधी

कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची यादी बरीच मोठी आहे. विद्यापीठातील अधिविभागातील प्राध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, खासगी विद्यापीठांमधील पदाधिकारी हे इच्छुक आहेतच. या शिवाय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातूनही काही प्राध्यापक आणि अधिष्ठातांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये प्रा. डॉ. संजय सोनवणे, प्रा. डॉ. अंजली कुरणे, प्रा. डॉ. विजय खरे यांनी या पदासाठी अर्ज केल्याचे समजते. दरम्यान, ऑनलाइन अर्ज करण्याचा आजचा (ता.2) शेवटचा दिवस आहे. मात्र, पोस्टाने अर्ज पाठवण्यासाठी शुक्रवार (ता. 10) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यभार 17 जूनला संपला. त्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. तत्पूर्वी 3 जूनला नव्या कुलगुरूंची निवड करण्यासाठी शोध समिती स्थापन करून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. उद्या (ता. 2) अर्ज करण्याचा अंतिम दिवस आहे. या पदासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील इच्छुकांनी अर्ज केले आहेतच; पण पुणे येथूनही काही अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये आंतरविद्याशाखीय विभागाचे आधिष्ठाता प्रा. डॉ. संजय सोनवणे, मानव्य विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. अंजली कुरणे, इंटरनॅशनल स्टडीज सेंटरचे प्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यांचा समावेश आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री अधिविभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव, माजी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, स्कूल ऑफ नॅनो सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजीचे प्रमुख प्रा. डॉ. पी. एस. पाटील, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही. जे. फुलारे, प्रा. डॉ. सोनकवडे. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले, प्रा. डॉ. पी. एस. कांबळे, प्रा. डॉ. जगन कराडे, प्रा. डॉ. विजय ककडे, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील प्रा. डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी अर्ज केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT