thief arrested with 93 grams of gold in ichalkaranji 
कोल्हापूर

अट्टल चोरटा 93 ग्रॅम सोन्यासह पोलिसांच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे महिन्याभरापूर्वी झालेली घरफोडी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरटा लोकेश रावसाहेब सुतार (वय 26, रा. खराव रोड, पाटील मळा, लिंगनूर, ता.मिरज) याला अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकी, मोबाईलसह 93 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत. 

इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. 
जयसिंगपूर-कोल्हापूर मार्गावरील निमशिरगांव गावच्या हद्दीत सापळा रचून इचलकरंजी गुन्हे शाखेच्या पथकांने सुतार याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांने संभाजीपूर येथे बंद घर फोडून दागिने लांबवल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, गंठण, चेन, अंगठ्या असे 93 ग्रॅम वजनाचे दागिने तसेच गुन्ह्यातील दुचाकी, मोबाईल जप्त केला. सुतार हा सातत्यांने पथकाला गुंगारा देत होता. उघडकीस आलेल्या घरफोडीची नोंद शिरोळ पोलिसांत झाली होती. त्यामुळे चोरटा सुतार याच्यासह जप्त मुद्देमाल शिरोळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकांने ही कारवाई केली. यामध्ये संभाजी भोसले, राजीव शिंदे, महेश खोत, रणजित पाटील, संजय इंगवले, प्रशांत कांबळे, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, शहनाज कनवाडे, राजू कांबळे, यशवंत कुंभार यांच्यासह सायबर विभागाचे सचिन बेंडखळे, सुरेश राठोड सहभागी झाले होते.

27 घरफोडीचे गुन्हे दाखल

 सुतार याच्यावर विविध पोलिस ठाण्यात 27 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगाव याच्यासह कर्नाटकातील अथणी, बिलगी, जमखंडी आदी पोलीस ठाण्यात सुतार याच्यावर घरफोडीचे गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : 'मराठी-कन्नड या दोन्ही भाषा माझ्यासाठी समान'; टीईटी परीक्षेबाबतही आमदार गोपीचंद पडळकरांचं महत्त्वाचं विधान

Gold Silver Price Drop : वर्षाचा शेवट गोड! सोने-चांदी दरात घसरण, नवीन वर्षात सोन्या चांदीचे भाव जाणून घ्या

Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री

Latest Marathi News Live Update : कृष्णेकाठी वसलेल्या साताऱ्यात आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार

2026 मध्ये OTT वर धुमाकूळ घालायला येताय नव्या सीरिज, प्रेम, ड्रामा, थ्रिल आणि अ‍ॅक्शनने भरलेली ही यादी, एकदा नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT