kolhapur sakal media
कोल्हापूर

यंदा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा होणार

सोशल डिस्टन्ससह कोरोनाच्या प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतच यंदाचा शाही दसरा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सोशल डिस्टन्ससह कोरोनाच्या प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतच यंदाचा शाही दसरा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे. अधिक गर्दी होवू नये, यासाठी सोहळ्याचे विविध माध्यमातून थेट प्रक्षेपण करणार असल्याची माहिती आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी दिली.

करवीरचा ऐतिहासिक दसरा सोहळा जगभरात प्रसिध्द आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे या सोहळ्याकडे लक्ष लागून राहिलेले असते. गेल्या वर्षी कोरोना संकटकाळात ऐतिहासिक दसरा चौकात होणारा सिमोल्लंघनाचा सोहळा रद्द करून हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात घेण्यात आला.

यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असून राज्यातील सर्व देवस्थान व देवालये दर्शनासाठी खुली झाली आहेत. त्यामुळे ऐतिहासिक शाही दसरा सोहळा शुक्रवारी (ता.१५) दसरा चौकातच पारंपरिक पध्दतीने होणार आहे. सोहळ्यासाठी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी आणि गुरूमहाराज वाड्यातील पालख्या दसरा चौकात येत असतात. करवीर छत्रपती घराण्याच्या उपस्थितीत हा सोहळा होतो. हा सोहळा कोल्हापूरच्या संस्कृतीचा, परंपरेचा ऐतिहासिक ठेवा असून यंदा कोरोनाचे नियम पाळूनच हा सोहळा होणार असल्याचेही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT