कोल्हापूर

घरगुती गणेशाच्या सजावटीत कोल्हापुरी फेट्यांची क्रेझ

सकाऴ वृत्तसेवा

यंदा तर गेल्या महिन्यापासून या फेट्यांसाठी आगाऊ नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जावू लागला आहे.

कोल्हापूर: घरगुती गणेशाच्या सजावटीमध्ये बऱ्यापैकी चीनमधून येणाऱ्या साहित्याचा वापर व्हायचा. पण, लॉकडाउनमुळे सारे जगच ठप्प झाल्यानंतर पुन्हा स्थानिक सजावटीच्या वस्तूंकडे लोक वळले. याच परिस्थितीत कापडी कोल्हापुरी फेट्यांची संकल्पना पुढे आली आणि या फेट्यांना बघता बघता गेल्या वर्षापासून मागणी वाढली. यंदा तर गेल्या महिन्यापासून या फेट्यांसाठी आगाऊ नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जावू लागला आहे.

गेल्या काही वर्षात घरगुती बाप्पांच्या सजावटीत फेटे आणि पितांबराला मोठी मागणी वाढली. मात्र, फेट्यांमध्ये प्लास्टिकच्या फेट्यांची रेंज उपलब्ध असायची. लॉकडाउनच्या काळात कापडी फेट्यांची व्हरायटी उपलब्ध झाली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. स्थानिक बाजारपेठेत या फेट्यांना मोठी मागणी राहिली. यंदा तर केवळ कोल्हापूरच नव्हे तर जगभरात कुठेही फेटे उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. कापडाच्या क्वालिटीनुसार पाचशे रूपयांपासून ते एक हजार रूपयांपर्यंतच्या रेंजचे फेटे यंदा उपलब्ध होणार असून, पुणे, मुंबई, गोवा आणि कर्नाटकातूनही त्यासाठी आगाऊ नोंदणी झाली आहे.

फेट्यांचे माप

घरगुती मूर्ती लहान असल्याने त्याच्या आकारानुसार फेट्यांसाठी माप घ्यावे लागते. ते बिनचूक असेल तरच मूर्तीवर फेटाही योग्य पद्धतीने शोभून दिसतो. वाढत्या मागणीमुळे मात्र प्रत्येक मूर्तीचे माप घेता येणे अशक्य असल्याने ते कशा पद्धतीने घ्यावे, याचे व्हिडिओ करून ते सोशल मीडियावरून शेअर केले आहेत आणि त्यानुसार ग्राहकांकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर नोंदणी करून घेतली जात आहे.

गणेशमूर्तींच्या फेट्यासाठी राजमान्य कोल्हापुरी फेटे या नावाने आम्ही फेटे उपलब्ध करून देत आहोत. सध्या महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि कर्नाटकातूनही मागणी वाढली असून, जगभरात कुठेही फेटे पाठवायचे असतील तर सोपे जावे, यासाठी ॲडजस्टेबल फेटेही तयार केले आहेत.

- प्रा. राजेश पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT