three family members died for corona in kolhapur 
कोल्हापूर

ह्रदयद्रावक ; २४ तासात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू ; गावाने फोडला हंबरडा 

सकाळ वृत्तसेवा

पुनाळ (कोल्हापूर) -  कोरोना महामारीने देशात थैमान घातले आहे. त्याची पाळेमुळे खणून काढेपर्यंत कोरोनाने खेडोपाडी पाय रोवले आहेत. जेवढे पाॕझिटीव्ह झाले तेवढे बरे पण झाले. मृत्यूचे प्रमाण जरी कमी असले ते चिंताजनक आहे. याचाच फटका कोतोली (ता.पन्हाळा ) येथील एकाच कुटुंबातील तीघांना बसला. कोरोनामुळे तीन जमांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, चौगले कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी केली. त्यामध्ये आणखी तिघांचा अहवाल पाॕझिटीव्ह आला. एकाच घरातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याने कुटुंबात चिंताजनक वातावरण होते. पण दूर्दैवाने त्यापैकी तिघांचा अवघ्या चोवीस तासात मृत्यू झाला.  या घटनेने कुटुंबारच काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा असा २४ तासात मृत्यू होण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

उषाताई बाजीराव चौगले (वय 62 ) यांचे रात्री एकच्या सुमारास निधन झाले. त्यापाठोपाठ त्यांच्या जाऊबाई श्रीमती अनुसया कृष्णात चौगले (वय 70) यांचे पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. त्यापाठोपाठ दूपारी उषाताई यांचे पती बाजीराव तुकाराम पाटील (वय 68 ) यांचेही निधन झाले. एकामागून एक दुःख पचवताना सगे-संबंधी व ग्रामस्थ भावनाविवश झाले. या एकत्रीत मृत्यूने कोतोलीसह परीसर हळहळला.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT