Three lakh patients suffering from more than one disease in Kolhapur district 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात एकापेक्षा जास्त आजाराचे पावणे तीन लाख रुग्ण

सदानंद पाटील

कोल्हापूर : "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या सर्वेक्षण मोहिमेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आत्तापर्यंत 94 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. शनिवारी (ता. 10) ही मोहीम पूर्ण होणार आहे. या सर्वेक्षणातून सुमारे 10 हजार लोकांना ताप, थंडी, खोकला असे आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 2 लाख 74 हजार 862 लोक हे एकपेक्षा अधिक आजाराचे (कोमॉर्बिड) रुग्ण असल्याचेही आढळून आले आहे. सारी रुग्णांची संख्या दीड हजारपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात या लक्षणे असलेल्या लोकांवर उपचार करण्याचे नियोजन केले जाणार आहे. 
राज्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी भविष्यात कोरोनाची लाट येण्याची शक्‍यताही नाकारली जात नाही. त्यामुळे पुढील काळात येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबरपर्यंत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मोठ्या ताकतीने ही मोहीम राबवली जात असून आत्तापर्यंत 94 टक्‍के लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 42 लाख इतकी असून 9 लाख 40 हजार इतकी घरांची संख्या आहे. यातील 9 लाख 25 हजार घरांचे व 39 लाख 37 हजार लोकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यासाठी 1836 पथकांच्या माध्यमातून 5508 लोक काम करत आहेत. 

मागील 8 महिन्यांपासून कोरोनाचे संकट आले आहे. गाव, वाड्या, वस्त्या आणि गल्ली, बोळात कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. कोरोनाला थोपवणे व आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी लॉकडाउन, वेळेची मर्यादा, सोशल डिस्टन्सिंग, कर्मचाऱ्यांवर मर्यादा, आस्थापना, शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली. मात्र फारकाळ बंद ठेवता येणार नसल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र जसजसे लोक घराबाहेर पडतील, तसे कोरोनाचा धोका वाढणार आहे. त्यामुळे लोकांना कोरोनासहच जगण्याची जीवनपद्धती अवलंबावी लागणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये मास्क वापरणे, साबणाने हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे याबाबत प्रबोधन करणे व दुसऱ्या बाजूला सर्व लोकांच्या आरोग्याची तपासणी करून गरज असणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेतून उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील नियोजन केले जाणार आहे. 

.... 
जिल्ह्याची लोकसंख्या 41, 97, 532 
सर्वेक्षण पूर्ण लोकसंख्या 39,37,313 
सर्वेक्षणाची टक्‍केवारी 94 टक्‍के 
कोमॉर्बिड (बहुआजार) रुग्णसंख्या 2,74,862 
सारीचे रुग्ण 1420 
ताप, थंडी, खोकला रुग्ण 9880 
संदर्भित रुग्णसंख्या 5441 
आरटीपीसीआर टेस्ट संख्या 3989 
संदर्भित रुग्णांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण 708 
.... 
माझे कुटुंब सर्वेक्षणातून जिल्ह्याची सर्व माहिती उपलब्ध होत आहे. याच्या आधारे पुढील टप्प्यात आरोग्याचे नियोजन कसे राहणार, कोणत्या बाबींवर लक्ष द्यावे लागेल, कोणत्या रुग्णांना कशापद्धतीने उपचार करावे लागतील, कोमॉर्बिड लोकांवरील उपचार याची दिशा ठरवली जाणार आहे. तसेच मास्क वापरणे, साबणाने हात धुणे व अंतर ठेवणे याबाबतही जिल्ह्यात सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रबोधन होत आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

SCROLL FOR NEXT